बाजारसमिती आवाराबाहेर शेतमाल खरेदीवर आकारला जातोय शेष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 06:38 PM2018-11-17T18:38:05+5:302018-11-17T18:38:44+5:30

वाशिम : जिल्हयात बाजार समितीच्या आवाराबाहेर खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाला शेष आकारण्यात येवू नये अशी तरतूद असतांना शेतमालावर शेष आकारण्यात येत आहे.

The market is being levied on the purchase of commodities outside the market! | बाजारसमिती आवाराबाहेर शेतमाल खरेदीवर आकारला जातोय शेष!

बाजारसमिती आवाराबाहेर शेतमाल खरेदीवर आकारला जातोय शेष!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात बाजार समितीच्या आवाराबाहेर खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाला शेष आकारण्यात येवू नये अशी तरतूद असतांना शेतमालावर शेष आकारण्यात येत आहे. यांसदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी संबधितांना पत्र देवून याची चौकशीच्या सूचना १७ नोव्हेंबर रोजी दिल्या आहेत.
२५ आॅक्टोंबर २०१८ च्या शासन अध्यादेशाव्दारे महाराष्टÑ कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय)अधिनियम १९६३ क्रं. २० याच्या कलम ४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार बाजार क्षेत्रात विनियमन या मजकुराऐवजी बाजार तळ क्षेत्रात विनियमन हा मजूर समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार बाजार समिती आवारामध्ये खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाला शेष आकारण्यात येवू नये अशी तरतूद सुधारित अध्यादेशामध्ये करण्यात आली. तरी सुध्दा वाशिम जिल्हयामध्ये बाजार समितीच्या आवाराबाहेर विकण्यात आलेल्या शेतमालावर शेष आकारण्यात येत आहे. यासंदर्भात पंचाळा येथील नारायण श्रीरंग विभुते यांनी जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारकर्त्यांच्या मुदयांचे अवलोकन करुन सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्यात.  याच्या प्रति जिल्हयातील सर्व सहाय्यक निबंधक ,  बाजार समितीचे सभापती, सचिव, विठ्ठल कृषी खासगी बाजार, ना.ना. मुंदडा कृषी खासगी बाजार मालेगाव, रामदेव बाबा कृषी खासगी बाजार मानोरा, कृष्णा कृषी खासगी बाजार कारंजा यांना दिल्या आहेत.

Web Title: The market is being levied on the purchase of commodities outside the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.