मंगरुळपीर तालुक्यातील विद्यार्थीनीची विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:00 PM2018-02-20T15:00:51+5:302018-02-20T15:04:07+5:30

मंगरुळपीर - अकोला येथील जिल्हास्तर विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात पारवा येथील प्र. ग. गावंडे विद्यालयाच्या  ज्ञानेश्वरी समाधानराव लुंगे हिच्या भूमिती प्रतिकृतीची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे.

Mangrulpeer students science model selected for statelavel compitation | मंगरुळपीर तालुक्यातील विद्यार्थीनीची विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

मंगरुळपीर तालुक्यातील विद्यार्थीनीची विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

googlenewsNext
ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील प्र.ग.गावंडे विद्यालयातील विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी समाधान लुंगे ‘हसत खेळत भूमितीची ओळख’  ही विज्ञान प्रदर्शनी सादर केली होती. या विज्ञान प्रतिकृतीची महाराष्ट्र राज्य पातळीवर प्रदर्शनाकरिता निवड झाली आहे. या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल तिचे प्र. ग.गावंडे विद्यालयातील शिक्षकवृंदांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

मंगरुळपीर - अकोला येथील जिल्हास्तर विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात पारवा येथील प्र. ग. गावंडे विद्यालयाच्या  ज्ञानेश्वरी समाधानराव लुंगे हिच्या भूमिती प्रतिकृतीची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे. याबद्दल या विद्यार्थीनीचा शाळेच्यावतीने सोमवारी सत्कार करण्यात आला. 

शिक्षण विभाग,जि.प.अकोला इन्स्पायर अवार्ड योजना २०१७-२०१८ अंतर्गत, १५फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०१८ दरम्यान अकोला येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान  प्रदर्शनात मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील प्र.ग.गावंडे विद्यालयातील विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी समाधान लुंगे, शिक्षक जी. के. मुंढे, सचिन मनोहर वाळके, जी. वाय ठाकरे, तुषार संजय चव्हाण, डी.एन.राऊत यांनी  ‘हसत खेळत भूमितीची ओळख’  ही विज्ञान प्रदर्शनी सादर केली होती.  ज्ञानेश्वरी समाधान लुंगे हिने मार्गदर्शक विज्ञान शिक्षक गजानन  कुंडलिक मुंढे यांच्या मार्गदर्शनात बनविलेल्या ‘हसत खेळत भूमितीची ओळख’  या विज्ञान प्रतिकृतीची महाराष्ट्र राज्य पातळीवर प्रदर्शनाकरिता निवड झाली आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग पाटील, सचिव मधुकरराव गावंडे, मुख्याध्यापक  कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्ञानेश्वरी लुंगे हिच्या हसत खेळत विज्ञान या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल तिचे प्र. ग.गावंडे विद्यालयातील शिक्षकवृंदांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

Web Title: Mangrulpeer students science model selected for statelavel compitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.