सुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 02:35 PM2019-03-22T14:35:02+5:302019-03-22T14:35:07+5:30

वाशिम: जिल्ह्यातील ग्राहकांच्या सुविधेसाठी २३, २४ व ३१ मार्च २०१९ या सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

MahaVitaran's electricity bill payment centers started on the holidays! | सुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु!

सुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील ग्राहकांच्या सुविधेसाठी २३, २४ व ३१ मार्च २०१९ या सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. जिल्ह्यातील महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे उपरोक्त सुट्टीच्या दिवशीसुद्धा दैनंदिन वेळेप्रमाणे सुरु राहणार आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्राहकांकडे कृषी, व्यावसायिक, घरगुती आदी प्रकारातील वीज देयकाची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ३१ मार्चपूर्वी थकबाकीची वसूली करण्यासाठी महावितरणच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुटीच्या दिवसांत वीज बिल भरणा केंद्रे बंद राहू नये म्हणून सुट्टीच्या दिवशीसुद्धा वीज बिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील वीज बिल भरणा केंद्रे सुरुराहणार आहेत. तसेच ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावरदेखील आॅनलाईन पद्धतीने तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे सुद्धा वीज बिलाचा भरणा करता येणार आहे. ग्राहकांनी थकीत वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन बेथारिया यांनी केले.

Web Title: MahaVitaran's electricity bill payment centers started on the holidays!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.