Mahashivratri Festival:devotees visit the temple | महाशिवरात्री उत्सव: इंझोरीच्या गोमुखेश्वर संस्थानवर भाविकांची मांदियाळी

ठळक मुद्देइंझोरी येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही या ठिकाणी महाशिवरात्री उत्सवानिमित्त भागवत सप्ताहासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे.

इंझोरी: मानोरा तालुक्यासह जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या इंझोरी येथील गोमुखेश्वर संस्थानवर महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला असून, या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. 

इंझोरी येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही या ठिकाणी महाशिवरात्री उत्सवानिमित्त भागवत सप्ताहासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उत्सवाला ८ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे.  हभप सचिन महाराज धर्माधिकारी यांच्या वाणीतून दुपारी १२ ते ५ या वेळेत भागवत कथा वाचन होत आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. दरम्यान, गोमुखेश्वर संस्थानवर आयोजित महाशिवरात्री उत्सवात दैनंदिन कार्यक्रमात काकडा आरती, हरीपाठ, किर्तन, भजनांचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या १३ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त सकाळी ६ वाजता शिवलिंगाचा अभिषेक हभप प्रकाश महाराज जोशी यांच्या हस्ते व शिवलिला अमृतग्रंथाचे पारायण होईन, १५ फेब्रुवारीला सचिन महाराज धर्माधिकारी यांच्या काल्याच्या किर्तनानंतर दुपारी १२ वाजतापासून महाप्रसाद वितरणाला सुरूवात होणार आहे.