महारेशीम अभियान; तुती लागवड प्रशिक्षणासाठी लगबग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:52 PM2019-01-11T13:52:39+5:302019-01-11T13:52:56+5:30

वाशिम: यंदाच्या महारेशीम अभियानांतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून २२८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तुती लागवडीची प्रक्रिया १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान पूर्ण करणे आवश्यक असल्याने नोंदणी के लेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रेशीम विभागाकडून लगबग सुरू केली आहे. 

Maharisham Abhiyan; training for Tuti planting | महारेशीम अभियान; तुती लागवड प्रशिक्षणासाठी लगबग 

महारेशीम अभियान; तुती लागवड प्रशिक्षणासाठी लगबग 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदाच्या महारेशीम अभियानांतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून २२८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तुती लागवडीची प्रक्रिया १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान पूर्ण करणे आवश्यक असल्याने नोंदणी के लेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रेशीम विभागाकडून लगबग सुरू केली आहे. 
तुतीची लागवड ही तुती बेण्या पासून करायची असते. त्यासाठी  बेणे तयार करतांना ६ ते ८ महिने वयाच्या तुती झाडांची १० ते १२ मि.मि. जाडीच्या फांद्या निवडाव्या लागतात. या फांद्यांपासून किमान ३ ते ४ डोळे असलेले ६ ते ८ इंची लांबीचे बेणे तयार करावे लागते. ही प्रक्रिया बारकाईने आणि तंत्रशुद्ध पद्धतीने पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळे रेशीम विकास अधिकारी कार्यालयामार्फत शेतकºयांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. यंदा महारेशीम अभियानांतर्गत अमरावती विभागातील २२८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या अंतर्गत तुती लागवड ही १५ जानेवारीपासून करणे आवश्यक आहे. त्यापूर्वी शेतकºयांना लागवड प्रशिक्षण देण्याची गरज आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी तुतीची रोपवाटिका तयार करू शकतात. आता तुती लागवड कालावधी सुरू होण्यास अवघे चार दिवस उरल्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रेशीम विकास अधिकाºयांकडून तयारीची लगबग सुरू आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे. 

 

 जिल्ह्यात ४८२ शेतकºयांनी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी केली आहे. या अभियानांतर्गत येत्या १५ जानेवारीपासून तुती लागवड करणे आवश्यक असल्याने शेतकºयांना तुती लागवडीसाठी प्रशिक्षण देण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांसाठी एकाच ठिकाणी हे एकदिवसीय प्रशिक्षण येत्या दोन दिवसांत घेण्यात येईल.
-अरविंद मोरे, रेशीम विकास अधिकारी, वाशिम

Web Title: Maharisham Abhiyan; training for Tuti planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.