विद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:58 PM2018-08-21T12:58:26+5:302018-08-21T13:02:27+5:30

मानोली येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सापांची माहिती घेतानाच सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे घेतले.

Learn about snakebite management by students | विद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे

विद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे

Next
ठळक मुद्दे मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. सर्पमित्र सुबोध साठे, गणेश गोरले, शुभम ठाकूर, उल्हास मांढरे, वैभव इंगळे, अनुप इंगळे यांनी  विशेष परिश्रम घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: साप चावल्यानंतर आवश्यक उपाय योजना करून सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविता यावा म्हणून तालुक्यातील मानोली येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सापांची माहिती घेतानाच सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे घेतले. मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. 
वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने साप आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी विविध ठिकाणच्या शाळांत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अंतर्गत मंगरुळपीर मानोली येथील शाळेत ‘साप - समज आणी गैरसमज’ या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी, गावकºयांना सर्पचित्र प्रदर्शनीच्यो माध्यमातून सापांविषयी माहिती देण्यात आली, तसेच सर्पदंशव्यवस्थापन कसे करायचे ते प्रात्याक्षिकाद्वारे कळविण्यात आले. यावेळी सर्प अभ्यासक तथा मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे, त्यांचे सहकारी सर्पमित्र सुबोध साठे, गणेश गोरले, शुभम ठाकूर, उल्हास मांढरे, वैभव इंगळे, अनुप इंगळे यांनी  विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध प्रश्न उपस्थित करून सर्पदंश व्यवस्थापनाबाबत विस्तृत माहिती घेतली, तसेच साप आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी प्र्रयत्न करण्याचा संकल्पही केला. शाळेतील शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमाला गावकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Web Title: Learn about snakebite management by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.