श्रमदानातून तालुक्यातील गावे पाणीदार होण्याच्या मार्गावर

By ram.deshpande | Published: July 25, 2017 08:07 PM2017-07-25T20:07:28+5:302017-07-25T20:21:49+5:30

कारंजा लाड (वाशिम ): लोकप्रतिनिधीचे पाठबळ अधिका-यांची साथ समाजसेवी संस्थाचा पुढाकार व सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्मुळे नागरीकांनी स्वंयस्फूतीर्ने केलेले श्रमदान यातूनच या तालुक्यातील अनेक गावे आज पाणीदार होण्याच्या मार्गावर आहेत

From the labor plying of the karanja lad talukas, the villagers are getting watery | श्रमदानातून तालुक्यातील गावे पाणीदार होण्याच्या मार्गावर

श्रमदानातून तालुक्यातील गावे पाणीदार होण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देगावागावात जलसंवर्धन : बक्षिस वितरणाची लागली उत्सुकता गावागावातील दृश्य डोळयांना सुखावनारे

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम ): लोकप्रतिनिधीचे पाठबळ अधिका-यांची साथ समाजसेवी संस्थाचा पुढाकार व सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्मुळे नागरीकांनी स्वंयस्फूतीर्ने केलेले श्रमदान यातूनच या तालुक्यातील अनेक गावे आज पाणीदार होण्याच्या मार्गावर आहेत. गावागावात करण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या खोलीकरणात पावसाचे पाणी साचले जात असून हे गावागावातील दृश्य डोळयांना सुखावनारे आहे.
पाणी फांउडेशनच्या वतीने राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने मागील वपार्पासून हि स्पर्धा गावक-यांच्या सहकायार्ने राबविण्यात येत आहे. यावर्पी पाणी चळवळीकरीता कारंजर तालुक्याची यावर्षी निवड करण्यात आली. परीणामी तालुक्यात श्रमदानातून जलसंधारणाची चळवळ उभी झाली.
गावक-यांचे पाठबळ वाढविण्यासाठी कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांची प्रत्येक गावला जेसीबी देउन मदत केली तर माजी आमदार प्रकाश डहाके यांनी आर्थिक धनज व जानोरी गावातला आर्थिक मदत देउन सहकार्य केले. तसेच युवा रूरल स्वंयसेवी संस्थेच्या वतीने गावला श्रमदानासाठी प्रत्येकी १०० टिकास , फावडे व टोपले देण्यात आली. अश्या पध्दतीने गावातील दानशुर व्यक्तीने डिझेलसाठी मोठया प्रमाणात मदत केली. काहीनी घराचा वास्तू न करता रूपेश बाहेती यांनी दिड लाख रुपए व लग्न कमी खर्चात करून जलसंधारणांच्या कामासाठी संदेश गु-हाने यांनी ५० हजार रूपयाची मदत केली. अश्या पध्दतीने अनेक दानशुर व्यक्तीने जलसंधारणाच्या कामाकरीता मदत केली. त्याबरोबर जिल्हयाचे जिल्हाधिकारी, अधिकारी व विविध संघटनांनी श्रमदानासाठी मदत केली. त्यामुळे गावागावात सिसिटी, शेततळे, एल.बी.एस, गॅबियन बंधारा, नाला खोलीकरण आदी विविध प्रकारे जलसंधारणाचे कामे करण्यात आली. त्यामुळे आता झालेल्या पावसाचा एकही थेंब या चार ते पाच गावातून वाहुन गेला नाही.

स्पर्धेतील बक्षिसाच्या शर्यतीत ४ गावे
स्पर्धेच्या माध्यमातून १०६ गावातील नागरीकांनी प्रशिक्षण घेउन तालुक्यात स्पधेर्ची चढाओढ निर्माण झाली. यापैकी ४० गावानी स्पर्धेत भाग घउेन कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार स्पर्धेच्या निकपानुसार सर्वोत्तम जलसंधारणाची कामे जयपुर, काकडशिवनी, धनज, जानोरी, भुलोडा, शेवती, शिवन, वाई, महागाव या गावने केली. यापैकी जयपुर, काकडशिवनी, धनज, जानोरी ही चार गावे बक्षिसाच्या शर्यतीत आहेत. या चारही गावचे सत्यापन दोन समिती कडून करण्यात आले. या चारही गावानी जलसंधारणाची कामे श्रमदान व मशिनच्या सहाहयाने मोठया प्रमाणात केली. आता पावसाने गावातील परीसर तुटुंब भरल्याचा दिसत त्यामुळे हे खरे गावचे बक्षिस असल्याचे मत गावातील वॉटर हिरोज व्यक्त करीत आहे. पुणे येथे होणा-या बक्षिसास कोणते गाव पात्र होतात याकडे तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे.

वॉटर स्पर्धेच्या निकालांकडे गावांचे लक्ष
बक्षिस वितरण कार्यक्रम ६ आॅगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सिने कलाकार अमिर खान, सत्यजित भटकळ व डॉ अविनाश पोळ आदी मान्यवरांच्या हस्ते गावक-यांना सन्मानित करणार आहे. कारंजा तालुक्यातील बक्षिस कोणत्या चार पैकी एका गावला भेटणार यांची उत्सुकता गावक-यांमध्ये लागली आहे.

डॉ. अविनाश पोळ आज कारंजात
प्रशासन व गावक-यांच्या सहकायार्ने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेत चांगल्या पध्दतीने गावक-यांनी सहभाग घेउन गावे पाणीदार करण्यासाठी मदत केली. स्पर्धे दरम्यान काय गावक-यांना व प्रशासनाला काय अडचणी आल्यात व स्पर्धेत पुढील वर्पी काय सुधारणा असायला हवी या विपयावर चर्चा करण्यासाठी पाणी फांउडेशनचे राज्य समन्वयक डॉ अविनाश पोळ २६ जुलै सकाळी १० वा ३० मि. पंचायत समिती सभागृह येथे गावातील वॉटर हिरोज व गावात काम करणारे कर्मचारी यांची विचार मंथन बैठक घेणार आहे. या बैठकीला तहसीलदार सचिन पाटील व गटविकास अधिकारी डि.बी.पवार व तालुका कृपी अधिकारी समाधान धुळधुळ उपस्थित राहणार आहे. तरी काम करणाा-या गावातील वॉटर हीरोजने उपस्थित रहावे असे आव्हाहन पाणी फांउडेशनचे तालुका समन्वय यांनी केले आहे.

Web Title: From the labor plying of the karanja lad talukas, the villagers are getting watery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.