'कृषी' संजीवनी' योजनेबाबत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी उदासीनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:36 PM2017-11-18T18:36:05+5:302017-11-18T18:40:29+5:30

वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे.

'Krishi Sanjivani' scheme, farmers of Washim district not intrested |  'कृषी' संजीवनी' योजनेबाबत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी उदासीनच 

 'कृषी' संजीवनी' योजनेबाबत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी उदासीनच 

Next
ठळक मुद्दे५१ हजारांपैकी ११०० शेतकºयांची थकबाकी जमा योजनेची मुदत १५ दिवस वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली

वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे. या योजनेंतर्गत शुक्रवार १७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ५१ हजार ४६२ थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ ११०२ शेतकºयांनी थकबाकीची रक्कम जमा करून आपली जोडणी कायम केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुरुवातीला १५ नोव्हेंबरपर्यंत असलेली या योजनेची मुदत १५ दिवस वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील एकूण ५१ हजार ४६२ कृषीपंपधारक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्र होते.  या शेतकºयांकडे  १५२ कोटी २३ लाख ८६ हजार ४६ रुपये मूळ थकबाकी होती. यात कारंजा तालुक्यातील ९,४०४ कृषीपंप ग्राहकांकडे २४ कोटी १३ लाख २२ हजार ७०१, मालेगाव तालुक्यात ७,६७२ ग्राहकांकडे २० कोटी १७ लाख ८२ हजार ७४७, मंगरुळपीर तालुक्यातील ७,४९३ ग्राहकांकडील २२ कोटी १८ लाख ७४ हजार ९२०, मानोरा तालुक्यात ६,११८ ग्राहकांकडे १७ कोटी २५ लाख ५५ हजार ६०९, रिसोड तालुक्यात १०,३२६ ग्राहकांकडे ३४ कोटी ३४ लाख ४१ हजार ९९०, तर वाशिम तालुक्यातील १०,४४९ ग्राहकांकडे २६ कोटी १४ लाख ८ हजार ८१ रुपयांच्या मूळ थकबाकीचा समावेश होता.  दरम्यान, कृषीपंपांची वाढती थकबाकी लक्षात घेता वसुली करण्याच्या उद्देशाने चालू देयके अदा न करणाºया कृषीपंप धारकांच्या जोडण्या खंडीत करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला. तथापि, अपुºया पावसामुळे दुष्काळी स्थिती ओढवली असताना महावितरणकडून थकबाकी वसुलीची मोहीम उघडण्यात आल्याने शेतकरी वर्गात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली. त्यामुळे थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली; परंतु या योजनेला शेतकºयांकडून अपेक्षीत प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसत आहे. महावितरणकडून प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवार, १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील एकूण थकबाकीदार कृषीपंप धारकांपैकी केवळ १,१०२ कृषीपंप ग्राहकांनी योजनेत सहभाग घेऊन २ कोटी ६० लाख ६९२ रुपयांची मूळ थकबाकी जमा केली आहे. एकूण मूळ थकबाकीच्या तुलनेत ही रक्कम केवळ १.७० टक्के आहे.  

Web Title: 'Krishi Sanjivani' scheme, farmers of Washim district not intrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.