वाशिम जिल्ह्यात खरिपाची पिके बहरली ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:38 PM2018-07-02T14:38:46+5:302018-07-02T14:40:13+5:30

वाशिम : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके बहरली असून, यावर्षीही जिल्हयात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Kharipachi crops in Washim district! | वाशिम जिल्ह्यात खरिपाची पिके बहरली ! 

वाशिम जिल्ह्यात खरिपाची पिके बहरली ! 

Next
ठळक मुद्देखरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, ७० टक्क्यापेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या आहेत.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके आता चांगलीच बहरली.यावर्षीदेखील सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्याखालोखाल तूरीचा पेरा राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके बहरली असून, यावर्षीही जिल्हयात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, ७० टक्क्यापेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीसाठी १ लाख १ हजार ४६ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पुरेशे बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४४ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असून कृषी विभागाच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात खतही उपलब्ध झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके आता चांगलीच बहरली असल्याचे दिसून येते. यावर्षीदेखील सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्याखालोखाल तूरीचा पेरा राहणार आहे.
कळंबा  महाली परिसरात समाधानकारक पावसामुळे पिके बहरली आहेत. या परिसरात दमदार पाऊस पडल्याने बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.१५ जूनपूर्वी झालेल्या पावसाने या परिसरात पेरण्यांस सुरुवात झाली. २० जूनपर्यंत शंभर टक्के पेरण्या आटोपल्यात. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा समाधानकारक पाऊस झाल्याने  पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे या परिसरातील सर्वच पिकांत डवरणी करण्यात आली. कळंबा महाली येथील पूस नदीला पूरही आला होता. त्यामुळे परिसरातील गाव तलाव, विहीरी व बोअरवेल्सला पाणी आले आहे.

Web Title: Kharipachi crops in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.