Javanabhishek of Sohnamathala of Kawardhari devotees | कावडधारी भाविकांचा सोहंमनाथाला जलाभिषेक
कावडधारी भाविकांचा सोहंमनाथाला जलाभिषेक

मानोरा : मानोरा शहरातील श्री गणेश कावळ मंडळ संतोषीमाता नगर , जय विर हनुमान कावड मंडळ जुनी वस्ती मानोरा येथील हजारो शिवभक्त कावडधारी महिला, भाविकांच्या साक्षीने ११ ऑगस्टला सकाळी ७ वाजता गणपती मंदिरावर जावून दर्शन घेवून व अरूणावती नदीच्या पात्रातील पवित्र जल भरून कावडधारी मंडळ मुख्य मार्गाने डीजे , ढोल, ताशा व डफडीच्या तालावर ह्यहर हर महादेवाच्या नावाचा जयघोष करीत कावडधारी पायी श्रीक्षेत्र आसोला खु. येथे संत सोहमनाथांच्या चरणी जलाभिषेक करण्यासाठी मार्गक्रमण केले. संत सोहमनाथ महाराज मंदिर संस्थानवर चरणी जलाभिषेक करून सार्वत्रिक दमदार पाऊस येऊ दे अशी आळवणी केली. दरवर्षीप्रमाणे श्रावण मासात मानोरा शहरातील शिवभक्त व तालुक्यातील भाविकभक्त कावड पालखीचा उत्सव उत्साहात साजरा करतात. या उत्सवादरम्यान हजारो युवक, भाविक, पुरूष, महिला व व्यापारी सहभागी होऊन कावडधारी भाविकांना पावन होणार्‍या संत सोहंमनाथ मंदिरावर जलाभिषेक करण्यासाठी जातात. ११ ऑगस्टला जय विर हनुमान कावड मंडळ व गजराज कावड मंडळ, संतोषी माता नगर यातील भाविक गणेश मंदिर मानोरा येथ ेजमले. दर्शन घेतल्यानंतर अरूणावती नदीच्या पात्रातून शिवभक्त कावड मंडळांनी आपल्या कावडीत पवित्र जल घेऊन कावड मुख्य मार्गाने श्रीक्षेत्र आसोला खु. येथील नवसाला पावणारा देव म्हणून सोहंमनाथ महाराज यांचे जलाभिषेक करण्याकरिता हजारो युवक, महिला, पुरूष व व्यापारी भाविकांच्या साक्षीने डी.जे. ढोल ताशाच्या गजरात व डफडीच्या तालावर पायदळ ९ किलोमिटर जाण्यासाठी निघाले. या दरम्यान युवक कावडीत बेधुंद होवून हर हर महादेव, सोहंमनाथ महाराज की जय असा जयघोष करीत नृत्य सादर करत असताना भाविक त्यांच्या अंगावर पाणी टाकत पाऊस व्हावा म्हणून कावडाचे दर्शन घेवून पुजा अर्चा करून पावसासाठी साकडे घालत होते. ठिकठिकाणी कावडधारीसाठी चहा, नाश्ता, फराळ व पाण्याची व्यवस्था अनेक सेवाभावी नागरिकांनी केली होती. कावड पालखीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मानोरा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


Web Title: Javanabhishek of Sohnamathala of Kawardhari devotees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.