पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घेण्याच्या सूचना ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:04 PM2018-06-17T15:04:20+5:302018-06-17T15:04:20+5:30

   वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे पाणी तपासुन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

instruction of checking drinking water sources | पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घेण्याच्या सूचना ! 

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घेण्याच्या सूचना ! 

Next
ठळक मुद्देपावसाळा सुरु झाला असुन यादरम्यान ग्रामिण भागातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात दुषित होतात. तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बैठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले. दक्ष राहुन काम केल्यास पिण्याचे स्त्रोत सुरक्षित राहतील व लोकांचे आरोग्य चांगले राहिल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी सांगितले.

  
वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे पाणी तपासुन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
पावसाळा सुरु झाला असुन यादरम्यान ग्रामिण भागातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात दुषित होतात. परिणामी गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य विभाग, पंचायत विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा या विभागाची बैठक घेऊन याबाबत सुचना दिल्या. ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हातपंप, बोअर ईत्यादी सार्वजणिक स्त्रोतांची जैविक व रासायनिक पाणी नमुणे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बैठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले. या कामात विलंब झाल्यास व लोकांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला.
 
 ग्रामपंचायतींनी करावयाची कामे 
१) नियमित पाणी तपासणी करावी.
२) पाण्याचे नियमित शुद्धिकरण करावे.
३)  दर्जेदार (३४ टक्के क्लोरीन असलेली) ब्लिचिंग पावडरची खरेदी व पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा.
४)  पाण्याच्या स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा.

 
दुषित पाणी नमुन्याची टक्केवारी २१ वरुन २.५५ टक्क्यावर !
एप्रिल महिन्यात  २१ टक्के पाणी नमुने जैविकदृष्ट्या दुषित आढळले होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत व आरोग्य) यांच्यासह ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांची जिल्हा स्तरावर तातडीची सभा बोलवुन याबाबत आढावा घेतला. तसेच याबाबत संबंधितांची चांगलीच कानउघडणी केली होती. परिणामी संबंधित यंत्रणेमार्फत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे मे महिन्यातील अहवालानुसार दुषित पाणी नमुण्याची टक्केवारी २१ वरुन २.५५ टक्क्यावर आली आहे. यापुढेही असेच दक्ष राहुन काम केल्यास पिण्याचे स्त्रोत सुरक्षित राहतील व लोकांचे आरोग्य चांगले राहिल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी सांगितले.

Web Title: instruction of checking drinking water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.