ठळक मुद्देशेतकरी त्रस्त कृषी विभागाचे मार्गदर्शन


वाशिम : जिल्हयातील अनेक भागातील तूर पिकावर विविध स्वरूपातील किडींचा प्रादूर्भाव आढळून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. यासंदर्भात शेतकºयांनी कृषी विभागाकडे धाव घेतली असून त्याच्या नियंत्रणासाठी शेतकºयांनी कुठल्या उपाययोजना करायला हव्या, याबाबत कृषी विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून मार्गदर्शनही सुरु केले आहे.

तूर पिकावर पेरणीपासून कापणीपर्यंत वेगवेगळया किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच अनेक किडी तुरीवर स्वत:चे पोषण करतात; परंतू फुले व शेंगावर होणाºया किडीचे आक्रमण अत्यंत नुकसानकारक ठरलेले आहे. तूर पिकावर मुख्यत: हिरवी घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी, शेंगमाशीची अळी अशा तीन प्रकारच्या श्ोंगा पोखरणाºया किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी पिक कळी  धारणेपासून किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्याकरिता ५ टक्के निंबोळी अर्क फवारायला हव. पिकांमध्ये पक्षीथांबे उभारावे, विषबांधेचा प्रकार लक्षात घेता अधिक प्रमााणात रासायनिक फवारणी टाळावी, डब्यावरील मार्गदर्शन चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, लाल रंगाचे चिन्ह सर्वात विषारी, त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो किटक नाशके वापरण्यापुर्वी लेबल पुस्तिका वाचावी, किटक नाशके फवारताना संरक्षण कपडे, बुट, हात मोडपे, नाकावरील मास्क व चष्मा किटक नाशके मिश्रण काडीने निट मिसळून घ्यावे, औषध अंगावर आल्यास त्वरित आंघोळ करावी व फवारणीचे कपडे स्वच्छ धुवावेत, उपाशी पोटी फवारणी करु नये, फवारनींनंतर रिकाम्या बाटल्या नष्ट कराव्यात, तरीदेखील विषबाधा झाल्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात जावे, आरोग्य विभागाच्या १०८ या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, मार्गदर्शन सुचना पाळाव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. तसेच यासंदर्भात काहीही अडचणी असल्याने कृषी विभाग सदैव तत्पर असून शेतकºयांनी आपल्या अडचणी मांडण्याचे आवाहनही केल्या जात आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.