प्लास्टिक निर्मुलनासाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:30 PM2019-07-09T16:30:48+5:302019-07-09T16:31:24+5:30

पर्यावरण रक्षणाचा ध्यास: शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन इनरव्हील ...

Innerwheel initiative for plastic removal | प्लास्टिक निर्मुलनासाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार

प्लास्टिक निर्मुलनासाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार

Next

पर्यावरण रक्षणाचा ध्यास: शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन इनरव्हील क्लब वाशिमच्या सदस्यांनी प्लास्टिक निमुर्लनासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत क्लबच्या सदस्यांनी १ ते ८ जुलै दरम्यान वाशिम शहरातील शाळा, महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. 
शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतरही वाशिम शहरासह जिल्हाभरात प्लास्टिकचा सर्रास आणि मुक्त वापर सुरू आहे. यामुळे प्लास्टिक कचºयात मोठी वाढ होत असून, त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावर होत आहेत. ही एक सामाजिक समस्या असल्याने इनरव्हील क्बलच्या महिला सदस्यांनी वाशिम शहरात प्लास्टिक निर्मुलन अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत क्लबच्यावतीने वाशिम शहरातील शाळा, महाविद्यालयांत १ जुलै ते ८ जुलैदरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यात प्लास्टिकचे दुष्परिणाम कोणते, प्लास्टिक बंदीची आवश्यकता काय, पर्यावरण संवर्धन कसे करता येईल, या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्ष मंगला शिंदे यांनी प्लास्टिक निर्मुलनावर उत्तम पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले, तसेच प्लास्टिक निमुर्लनाबाबत विद्यार्थ्यांची निंबध स्पर्धा घेण्याचे आवाहनही केले. त्याचवेळी कापडी पिशव्यांचा प्रसार व प्रसार व्हावा म्हणून शाळा, महाविद्यालयांत सर्व मुख्याध्यापक्र, प्राचार्याना क्लबचा लोगो असलेल्या कापडी पिशव्या भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमासाठी क्लबच्या सदस्य हेमा विसपुते, शुभांगी दामले, निशा शेवलकर, मेघा देशमुख, मंजुश्री जांभरूणकर, शिल्पा लाहोटी, संगीता देशमुख व विना चरखा यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Innerwheel initiative for plastic removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.