सिलेंडर भडकल्याने घराला आग; ७५ हजार रुपयाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:37 PM2018-12-12T13:37:49+5:302018-12-12T13:38:09+5:30

काजळेश्वर उपाध्ये : येथील पुष्पा रघुनाथ कडू यांच्या घरातील गॅस सिलिंडरने भडका घेतल्याने घरातील महत्वाच्या वस्तु जळून खाक झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली.

Home fire after cylinder fires; 75 thousand rupees loss | सिलेंडर भडकल्याने घराला आग; ७५ हजार रुपयाचे नुकसान

सिलेंडर भडकल्याने घराला आग; ७५ हजार रुपयाचे नुकसान

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
काजळेश्वर उपाध्ये : येथील पुष्पा रघुनाथ कडू यांच्या घरातील गॅस सिलिंडरने भडका घेतल्याने घरातील महत्वाच्या वस्तु जळून खाक झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. यामध्ये जवळपास ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
१२ डिसेंबर रोजी सकाळी पुष्पाबाई स्वयंपाक करण्यासाठी गेले असता शेगडी लावत असताना अचानक सिलिंडरने पेट घेतला. गॅस सिलिंडर लिक असल्याने ही घटना घडली. अचानक सिलेंडरने पेट घेतल्याने घरातील संपूर्ण साहित्य व घराचे नुकसान झाले. घरात झालेल्या आरडाओरडीमुळे शेजाºयांनी धावत येवून गावकºयांच्या सहाय्याने सिंलीडर बाहेर काढून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बरेचसे नुकसान झाले होते. यावेळी घरात पुष्पाबाई सह त्यांचा मुलगा ऋषी घरात होता.  या दुर्घटनेत  १८ ग्रॅमची सोन्याची पोथ,   सात हजार रुपये, मोबाईल, कपडे,  महत्वाची कागदपत्रे, धान्य इत्यादी जवळपास ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले . ही आग विझवितांना ऋषिकेष जखमी झाला. सदर कुटुंब मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत असल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

Web Title: Home fire after cylinder fires; 75 thousand rupees loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.