जबर मारहाण करून इसमाचे अपहरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:56 AM2017-08-19T00:56:17+5:302017-08-19T00:56:56+5:30

वाशिम: स्थानिक खोडेमाऊली नगर येथे वास्तव्यास असलेले भारत शिंदे (वय ४२ वर्षे) यांना चार ते पाच लोकांनी जबर मारहाण करून त्यांचे अपहरण केले. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तथा शिंदे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत तीन आरोपींना अवघ्या काही तासांतच अटक करून जखमी शिंदे यांना उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. ही गंभीर घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.

Hijacking forcibly! | जबर मारहाण करून इसमाचे अपहरण!

जबर मारहाण करून इसमाचे अपहरण!

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम येथील घटना आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्थानिक खोडेमाऊली नगर येथे वास्तव्यास असलेले भारत शिंदे (वय ४२ वर्षे) यांना चार ते पाच लोकांनी जबर मारहाण करून त्यांचे अपहरण केले. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तथा शिंदे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत तीन आरोपींना अवघ्या काही तासांतच अटक करून जखमी शिंदे यांना उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. ही गंभीर घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.
यासंदर्भात शिंदे यांच्या पत्नी लताबाई यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की त्यांचे पती भारत यांना खोडेमाऊली नगर येथे चार ते पाच लोकांनी मारहाण करून बेशुद्ध पाडले व त्यानंतर त्यांना एमएच ३७ जी १७३८ या क्रमांकाच्या वाहनात टाकून घटनास्थळाहून पोबारा केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अवचार, पोलीस उपनिरीक्षक मस्के, राजेश बायस्कर, प्रशांत अंभोरे, गजानन कर्‍हाळे,  सुषमा रंगारी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेची माहिती जाणून घेतली व त्याआधारे नमूद क्रमांकाच्या वाहनाचा शोध घेतला. यादरम्यान सदर वाहन कोंडाळा रोड, शिक्षक कॉलनीसमोरील मुरलीधर गणपत वाणी यांच्या शेतासमोर उभे असल्याचे आढळून आले. वाहनाशेजारी असलेल्या टिनपत्र्याच्या खोलीची पाहणी केली असता, तेथे मुरलीधर वाणी, दौलत इंगोले,  लीलाबाई वाणी हजर होते. यासह गंभीर जखमी अवस्थेत भारत शिंदे हेदेखील पडून असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. यावेळी पोलिसांनी वाहनासह नमूद सर्व आरोपींना ताब्यात घेतले. जखमी शिंदे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांची अकोला येथे रवानगी करण्यात आली. तथापि, पोलिसांनी अपघ्या काही तासांतच घटनेचा शोध लावल्याने भारत शिंदे यांचे प्राण बचावले. याप्रकरणी लताबाई शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Hijacking forcibly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.