वृक्ष लागवडीसाठी ‘आशा’ही सरसावल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:03 PM2018-07-04T17:03:45+5:302018-07-04T17:06:29+5:30

राजुरा - पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षलागवड मोहिम शासनाने हाती घेतली असून, आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशास्वयंसेविकाही पुढे सरसावल्या असून १ जुलैपासुन जिल्हाभरात एक जन्म एक वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला.

health employees cultivation of trees! | वृक्ष लागवडीसाठी ‘आशा’ही सरसावल्या !

वृक्ष लागवडीसाठी ‘आशा’ही सरसावल्या !

Next
ठळक मुद्देभारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए.एस.नाथन हे ‘एक जन्म एक वृक्ष’या मोहिमेची अंमलबजावणी करत आहेत. मोहीमेंतर्गत ज्या कुटूंबात नवजात बालकांचा जन्म झाला त्या कुटूंबांचेवतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते.वृक्षाचे जतन करण्याकरिता आशा स्वयंसेविका वारंवार त्या कुटूंबांचे घरी जावुन वृक्षसंवर्धनबाबत प्रोत्साहीत करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा - पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षलागवड मोहिम शासनाने हाती घेतली असून, आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशास्वयंसेविकाही पुढे सरसावल्या असून १ जुलैपासुन जिल्हाभरात एक जन्म एक वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला.
भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए.एस.नाथन हे ‘एक जन्म एक वृक्ष’या मोहिमेची अंमलबजावणी करत आहेत. सदर मोहीमेंतर्गत ज्या कुटूंबात नवजात बालकांचा जन्म झाला त्या कुटूंबांचेवतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. वृक्षाचे जतन करण्याकरिता आशा स्वयंसेविका वारंवार त्या कुटूंबांचे घरी जावुन वृक्षसंवर्धनबाबत प्रोत्साहीत करीत आहेत. सदर उपक्रमामुळे जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे.
विशेषत: नवजात बालकांचे जे नाव कुटुंबियांकडुन ठेवण्यात येईल, तेच नाव वृक्षालाही देण्यात येत असून बाळांच्या वाढदिवसाप्रमाणे वृक्षाचाही वाढदिवस साजरा करण्यासाठी आशा स्वयंसेविका  ग्रामस्थांना प्रेरीत करीत आहेत. यामुळे बाळाप्रमाणे त्या कुटूंबाला वृक्षाविषयहीदेखील लळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशा स्वयंसेविका कुटुंबांना वारंवार भेटी देवुन झाडाला काटेरी कुंपन तयार करणे व उन्हाळ्याचे दिवसात झाडाची निगा कशा प्रकारे राखायची या बाबतचे मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल मेहकरकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  डॉ.ज्ञानेश्वर ससे, आशा जिल्हा समुह संघटक अनिल उंदरे व सर्व तालुका समुह संघटकांचे मार्गदर्शनाखाली  जिल्हाभरातील  एक हजारावर आशा स्वयंसेविकांनी एक जन्म-एक वृक्ष या उपक्रमास १ जुलैपासुन प्रारंभ केल्याने वृक्षारोपण मोहिमेस चांगलाच हातभार लाभणार आहे.

Web Title: health employees cultivation of trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.