विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:52 PM2018-03-12T13:52:14+5:302018-03-12T13:52:14+5:30

वाशिम : शासनाकडून विविध स्वरूपातील ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यात यशस्वी होणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक अनिवार्य असून ते ग्रामपातळीवर गोळा करणे मुख्याध्यापकांना बहुतांशी अशक्य होत आहे. 

Headmaster gets impossible to collect student's Aadhar card! | विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य!

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य!

Next
ठळक मुद्देशाळांमधील कामकाज जेव्हापासून आॅनलाईन झाले, तेव्हापासून मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे.. ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक करावे लागतात.विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक आवश्यक असून ते गावातून गोळा करण्यासाठी मुख्याध्यापकांना मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत.


वाशिम : शासनाकडून विविध स्वरूपातील ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यात यशस्वी होणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक अनिवार्य असून ते ग्रामपातळीवर गोळा करणे मुख्याध्यापकांना बहुतांशी अशक्य होत आहे. 
शाळांमधील कामकाज जेव्हापासून आॅनलाईन झाले, तेव्हापासून मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. शिक्षकांच्या पगारातून होणारी कपात त्या-त्या खात्यांमध्ये जमा करणे, पगारपत्रक तयार करून ते आॅनलाईन अपलोड करणे, ही सर्व कामे मुख्याध्यापकांनाच पाहावी लागत असून त्यातच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ‘रेकॉर्ड’ही ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडेच सोपविण्यात आली आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक आवश्यक असून ते गावातून गोळा करण्यासाठी मुख्याध्यापकांना मोठे परिश्रम घ्यावे लागत असल्याने मुख्याध्यापक यामुळे हैराण झाले आहेत.

मुख्याध्यापकांचे मुख्य काम ज्ञानार्जन करणे हे होय. मात्र, शाळांमध्ये ‘आॅनलाईन’ प्रणाली अंमलात आली तेव्हापासून मुख्याध्यापकांच्या खांद्यावरच अधिकची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक करावे लागतात. ते गावातून गोळा करित असताना पालकांशी संपर्क होत नाहीत, त्यांचे फोन लागत नाहीत. यामुळे मोठी दमछाक होते. 
 - उद्धव कष्टे, मुख्याध्यापक.

Web Title: Headmaster gets impossible to collect student's Aadhar card!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.