किसान कल्‍यान अभियान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:29 PM2018-07-06T18:29:49+5:302018-07-06T18:30:23+5:30

वाशिम: कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा) द्वारा  ६ जुलै रोजी तालुक्यातील घोटा येथे जि.प.शाळेच्या सभागृहात किसान कल्‍यान अभियान कार्यक्रम अंतर्गत जिल्‍हयांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला होता.

Guidance for farmers under Kisan Kalyan campaign program | किसान कल्‍यान अभियान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

किसान कल्‍यान अभियान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक वाशिमचे तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक जयप्रकाश लव्‍हाळे यांनी केले.  शेतकरी गट कसा तयार करावा व सेंद्रीय शेती विषयी व नेडेप तयार करण्‍याविषयी मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा) द्वारा  ६ जुलै रोजी तालुक्यातील घोटा येथे जि.प.शाळेच्या सभागृहात किसान कल्‍यान अभियान कार्यक्रम अंतर्गत जिल्‍हयांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्‍थानी गावातील सरपंच सविता सुमेध कांबळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद विज्ञान शाखा प्रमुख इंगोले व कृषि विज्ञान केंद्र करडाचे पशू विज्ञान शाखा प्रमुख डॉॅ. रामटेके, अनसिंगचे मंडळ कृषि अधिकारी सुभाष उलेमाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक वाशिमचे तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक जयप्रकाश लव्‍हाळे यांनी केले. त्यांनी केंद्र शासनाच्‍या किसान कल्‍यान अभियाची माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याची योजना,  शेतकरी गट कसा तयार करावा व सेंद्रीय शेती विषयी व नेडेप तयार करण्‍याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक इंगोले यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्याचे उपाय यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच फळझाडे लागवडीचे फायदे सांगितले, तर डॉॅ.रामटेके पशू विज्ञान शाखा प्रमुख यांनी शेळीपालन, तसेच दुधाळ जनावरांची काळजी या बाबत माहिती दिली. त्याशिवाय लसीकरणाचे महत्‍व पटवून दिले. उलेमाले यांनी कृषि विभागाच्या योजनांची माहीती दिली. जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाचन करुन वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक राऊत, कृषी सहाय्यक दंडे, ग्राम विकास अधिकारी बोदडे उपस्थित होते. सरपंच सविता सुमेध कांबळे यांचे हस्‍ते किसान कल्‍याण अभियानातंर्गत १०० लाभार्थींना ५०० फळ झाडे वाटपाचा कार्यक्रमही यावेळी घेण्‍यात आला. गावाचा सर्वांगीण विकास होईल, अशी किसान कल्‍यान अभियान योजना असून, आम्‍ही सर्व गावकरी यासाठी सहकार्य करणार असल्‍याचे सरपंचांनी सांगितले. सदर कार्यक्रमास बहुतांश शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: Guidance for farmers under Kisan Kalyan campaign program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.