ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची राहणीमान भत्त्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 02:31 PM2019-01-21T14:31:02+5:302019-01-21T14:31:06+5:30

मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील पोघात, घोटा आणि कवठळ या तीन ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाºयांचा राहणीमान भत्ता तीन वर्षांपासून मिळाला नाही.

Gram panchayat retaired employees not get maintenance allowence | ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची राहणीमान भत्त्यासाठी पायपीट

ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची राहणीमान भत्त्यासाठी पायपीट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील पोघात, घोटा आणि कवठळ या तीन ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाºयांचा राहणीमान भत्ता तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यासाठी ते सतत पंचायत समितीत पायपीट करीत असून, याबाबत उपोषण करूनही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे राहणीमान भत्त्यासाठी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी ेसोमवारी दिला आहे.  
 ग्राम  शिवणी येथील कळणून भिवसन वानखडे, केशव नारायण आडोळे, बजरंग रामदिन गुप्ता हे ग्रामपंचायतचे निवृत्त शिपाई आहेत. त्यांना शासनाच्या निर्णयानुसार राहणीभत्ता मिळणे अपेक्षीत असताना गेल्या तीन वर्षांतील त्यांचा राहणीभत्ता थकला आहे. याबाबत त्यांनी मंगरुळपीरचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या निवृत्त शिपायांनी २० मार्च २०१६ रोजी मंगरुळपीर पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले. त्यावेळी तत्कालीन गटविकास अधिकाºयांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि आठ दिवसांत राहणीमान भत्ता अदा करण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. तथापि, त्याची दखल घेण्यात आली नाही आणि यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी कार्यवाही चालू असल्याचे सांगत वारंवार वेळ मारून नेली. त्यामुळे अद्यापही या कर्मचाºयांना राहणीमान भत्ता मिळालेलाही. या प्रकारामुळे हे वृद्ध निवृत्त कर्मचारी कंटाळले असून, येत्या २५ जानेवारीपर्यंत राहणीमान भत्ता न मिळाल्यास पुन्हा उपोषण सुरू करू, असा इशारा त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

Web Title: Gram panchayat retaired employees not get maintenance allowence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.