हंगामाच्या अखेरीसही शासकीय कापूस खरेदी निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 02:51 PM2019-02-03T14:51:30+5:302019-02-03T14:51:49+5:30

वाशिम : अकोला विभागात ५ केंद्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि, यंदाचा हंगाम संपत आला असताना एकाही केंद्रावर क्विंटलभर कापसाचीही खरेदी होऊ शकली नसून, यंदा अकोला विभागातील शासकीय कापूस खरेदी निरंकच राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Government Cotton Purchase not responce from farmers | हंगामाच्या अखेरीसही शासकीय कापूस खरेदी निरंक

हंगामाच्या अखेरीसही शासकीय कापूस खरेदी निरंक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अकोला विभागात ५ केंद्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि, यंदाचा हंगाम संपत आला असताना एकाही केंद्रावर क्विंटलभर कापसाचीही खरेदी होऊ शकली नसून, यंदा अकोला विभागातील शासकीय कापूस खरेदी निरंकच राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रीय कापूस महामंडळासाठी (सीसीआय) कापूस पणन महासंघ महाराष्ट्र (फेडरेशन) च्यावतीने अकोला विभागात २० नोव्हेंबरपासून कापूस खरेदीसाठी ५ केंद्र सुरु करण्यात आली. यात अकोला जिल्ह्यात तेल्हारा, पारस आणि कानशिवणी, तर वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि मानोरा येथील शासकीय खरेदी केंद्राचा समावेश आहे. यंदा शासनाच्यावतीने मध्यम धाग्याच्या कापसाला ५१५०, तर लांब धाग्याच्या कापसाला ५४५० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषीत केले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या हमीभावात शासनाने ११३० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शासकीय कापूस खरेदीला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, व्यापाºयांकडून कापसाला हमीभावापेक्षा अधिक भाव देण्यात येत असल्याने शेतकरी रोखीने व्यापाºयांकडेच कापूस विकण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम संपत आला तरी अकोला विभागातील पाचही केंद्रांवर एक क्विंटल कापसाचीही खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे यंदाचा हंगाम शासकीय कापूस खरेदी केंद्रांसाठी निरंकच ठरणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: Government Cotton Purchase not responce from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.