डॉक्टर जोडप्याला मुलगी झाली अन् मोफत तपासणीची घोषणा केली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:19 PM2018-11-20T17:19:56+5:302018-11-20T21:40:23+5:30

येथील एका डॉकटर दाम्पत्याने चक्क कन्यारत्न प्राप्त होताच सप्ताहाभर रुग्णांची मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्षात कामास सुरुवात केली आहे.

free service by doctors couple after birth of girl | डॉक्टर जोडप्याला मुलगी झाली अन् मोफत तपासणीची घोषणा केली!

डॉक्टर जोडप्याला मुलगी झाली अन् मोफत तपासणीची घोषणा केली!

googlenewsNext

- नंदकिशोर नारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बेटी बचाओसाठी विविध प्रकारची जनजागृती, प्रशासनाच्यावतिने उपक्रम, सामाजिक संघटना सरसावलेल्या आहेत. येथील एका डॉकटर दाम्पत्याने चक्क कन्यारत्न प्राप्त होताच सप्ताहाभर रुग्णांची मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्षात कामास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचेसर्वत्र कौतूक होत आहे.
वाशिम येथील डॉ. सचिन पवार व डॉ. सोनाली पवार या डॉक्टर दाम्पत्याने त्यांना कन्यारत्न प्राप्त होताच तीचे स्वागत केले. तसेच १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत ओ.पी.डी., ई.सी.जी. व शुगर तपासणी मोहीम मोफत सुरु केली.
वाशिम जिल्हयात ‘कन्यारत्न’ जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन आणि मिठाई देण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून प्रभाविपणे ते असेपर्यंत साकारण्यात आला. या उपक्रमातून अभिनंदनपर शुभेच्छा कार्ड तयार करण्यात आले होते. जिल्ह्यात कुठेही कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय व जि.प. महिला व बालकल्याण विभागाच्या चमूतर्फे संबंधित गावात जाऊन माता-पित्यांचे अभिनंदन करून मिठाई दिली जात होती. या अभिनंदनपर कार्डवर ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’संदर्भात विविध घोषवाक्य , शासनाच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेची माहिती संकलित करण्यात आली होती.  या उपक्रमाव्दारे ाुलीच्या जन्माची माहिती मिळताच माता-पित्यांचे अभिनंदन करून ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला जात होता. परंतु राहुल व्दिवेदी यांची बदली झाल्यानंतर हा उपक्रमही बंद झाल्यासारखा दिसून येत आहे. परंतु डॉ. पवार दाम्पत्याने राबविलेल्या या उपक्रमाचे आरोग्य क्षेत्रात कौतूक होत असून त्यांच्या उपक्रमाचे स्तुती करण्यात येत आहे.

कन्यारत्न प्राप्त झालेल्या दाम्पत्यांना मिठाई वाटप उपक्रमाचा प्रशासनाला विसर
स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात  ‘कन्यारत्न’ जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन आणि मिठाई देण्याचा उपक्रम तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या संकल्पनेतून जिल्हयात राबविला जात होता. याकरिता तसे चोख नियोजन सुध्दा करण्यात आले होते. परंतु या अभिनव उपक्रमाचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.

डॉ. पवार दाम्पत्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये सुरु केलेला हा नविन पायंडा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. एकीकडे संपूर्ण जग कमाईच्या मागे लागलेला असतांला या दाम्पत्यांनी समाजहित लक्षात घेता घेतलेला निर्णय खरोखर प्रशंसनीय आहे. लवकरचं त्यांचा गौरव केल्या जाईल.
- डॉ. दिपक ढोके
संयोजक, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, वाशिम

Web Title: free service by doctors couple after birth of girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.