वन विभागाच्या चमूला यश : पिसाळलेले माकड अखेर चौथ्या दिवशी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:14 AM2018-01-26T00:14:32+5:302018-01-26T00:15:13+5:30

शिरपूर जैन : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणार्‍या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले.

Forest department team success: Dangerous monkey finally seized on fourth day! | वन विभागाच्या चमूला यश : पिसाळलेले माकड अखेर चौथ्या दिवशी जेरबंद!

वन विभागाच्या चमूला यश : पिसाळलेले माकड अखेर चौथ्या दिवशी जेरबंद!

Next
ठळक मुद्देमाकडाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणार्‍या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले.
गत आठवड्यापासून शिरपूर येथे एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला होता. गत तीन दिवसांत तीन जणांना या माकडाने चावा घेऊन जखमी केले होते. या माकडाला पकडण्यासाठी गत तीन दिवसांपासून वनविभागाची चमू शर्थीचे प्रयत्न करीत होती. 
२५ जानेवारी रोजी सकाळपासूनच वनविभागाची चमू आवश्यक त्या शस्त्र व सापळ्यासह शिरपुरात दाखल झाली होती. माकड शोधल्यानंतर त्याला पकडण्यासाठी या चमूने शर्थीचे प्रयत्न केले. दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या चमूला यश मिळाले. आता या माकडाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे.

Web Title: Forest department team success: Dangerous monkey finally seized on fourth day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.