अशोक मानकर यांच्या नाटकाला नाटय परिषदेचे प्रथम पारितोषीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 09:18 PM2017-11-15T21:18:55+5:302017-11-15T21:24:45+5:30

अखिल भारतीय नाट्य परिषद , मध्यवर्ती  शाखा मुंबई यांच्यावतीने आयोजित यंदाच्या नाट्य लेखन, स्पर्धेत येथील विनोदी व कथालेखक अशोक मानकर यांच्या 'केस नंबर ८५' या व्यावसायीक नाटकाला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले.

The first prize of the Natya Parishad to Ashok Mankar | अशोक मानकर यांच्या नाटकाला नाटय परिषदेचे प्रथम पारितोषीक

अशोक मानकर यांच्या नाटकाला नाटय परिषदेचे प्रथम पारितोषीक

googlenewsNext
ठळक मुद्देनाटय, लेखन स्पर्धा मोहन जोशींच्या हस्ते पारितोषिक

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : अखिल भारतीय नाट्य परिषद , मध्यवर्ती  शाखा मुंबई यांच्यावतीने आयोजित यंदाच्या नाट्य लेखन, स्पर्धेत येथील विनोदी व कथालेखक अशोक मानकर यांच्या केस नंबर ८५ या व्यावसायीक नाटकाला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले. मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात नाट्य परिषदेचे अध्यक्ष  तसेच अभिनेते मोहन जोशी यांच्याहस्ते मानकर यांना हे पारितोषीक प्रदान करण्यात आला.
केस नं.९  ही अशोक मानकर यांची दुसरी नाटयकृती असुन  यापुर्वी त्यांनी लिहीलेल्या माकळ या एकाकीकेला बोलीभाषा  एकांकीला स्पर्धेत सर्वाेत्कृष्ट  लेखनासह एकुण दहा पारितोषीक प्राप्त झाली होती. त्यांचे हेंबाळपंथी, हनुेर, गणपती फॅमीली इन न्युयॉर्क, गचकअंधारी हे कथासंग्रह, प्रकाशीत झालेले आहेत. यातील गचकअंधारी संग्रहातील याच शिर्षकाच्या कथेचा यंदापासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळ, बालभारती इयत्ता सातवीच्या मराठीच्या पुस्तकात पाठ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.  महाराष्ट्रातील मान्यवर दिवाळी अंकातुन त्यांच्या कथा प्रकाशीत होत असतात. अशोक  मानकर यांनी काही चित्रपट आणि मालीकांचे कथा व संवाद लेखनही केलेली आहे. माकळ या एकांकीकेचे पश्चिम महाराष्ट्रात प्रयोग  सुरु आहेत. अशोक मानकर हे सध्या मुंबईच्या एका चित्रपट व मालीका निर्मिती संस्थेत क्रिएटीव्ह हेड म्हणुन कार्यरत असुन त्यांच्या लेखनावर हिंदी चित्रपट आणिमालीका प्रस्तावित आहेत. त्यांच्या अनेक कथांना यापुर्वी राज्यस्तरीय  स्पर्धामधुन पारितोषीक मिळालेली आहेत.

Web Title: The first prize of the Natya Parishad to Ashok Mankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.