वाशिममधील पहिला व सर्वात मोठा प्रयोग : 10 शेतांवर रेशीम कोष उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 12:15 PM2018-01-20T12:15:45+5:302018-01-20T12:21:03+5:30

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील शेतक-यांनी विविध संकटावर मात करून सामूहिक रेशीम शेती यशस्वी केली.

First and largest farming experiment in Washim | वाशिममधील पहिला व सर्वात मोठा प्रयोग : 10 शेतांवर रेशीम कोष उत्पादन

वाशिममधील पहिला व सर्वात मोठा प्रयोग : 10 शेतांवर रेशीम कोष उत्पादन

Next

वाशिम :  जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील शेतक-यांनी विविध संकटावर मात करून सामूहिक रेशीम शेती यशस्वी केली. त्यामुळे विकासाची चक्रे वेगाने फिरत गावात एकी कायम ठेवण्याचे आणि आर्थिक सुब्बताता मिळवन्याचे कार्य शेतक-यांनी केले आहे.
तालुक्यातील ढोरखेडा गावावर काही वषार्पूर्वी मोठे चक्रीवादळ आले होते त्यामध्ये संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले होते . मात्र  गावक-यांनी ना उमेद न होता जिद्दीने जगण्याचा संकल्प केला. सरपंच सुनीता बबन मिटकरी यांनी गावक-यांच्या सहकायार्ने गावात अमूल्य ऐसा इतिहास घडविला. सर्वत्र विकास करतानाच शेत शिवाराकडे लक्ष देणे सुरू केले.  ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन रेशीम शेतीसाठी रामदास दिगांबर गावंडे , दत्ता विश्वनाथ मिटकरी, शंकर प्रकाश शिरोळे , दत्ता विठोबा गावंडे , नारायण बळीराम ढवळे , विश्वनाथ मिटकरी, भागवत विक्रम सावले,  संतोष श्रीराम ढवळे , कैलास ढवळे ,बळीराम सावले यांचा ठराव घेत सामूहिक रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी  केला आहे 

या शेतक-यांना तीन वर्षांकरिता प्रत्येकी दोन लाख 90 हजार चे अनुदान वाशीम येथील रेशीम प्रकल्प विभागाकडून मिळाले.  यामध्ये प्रतिमाह सहा हजार रुपये मजुरी सुद्धा मिळते . ढोरखेडा येथील बबनराव मिटकरी यांनीही रेशीम शेती  नव्यानेच तालुक्यात केली जात असल्याने वारंवार याबाबत कृषी विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शन कण्यासाठी शेतीवर बोलवले . तसेच 10 शेतक-यांचा समूह इतर जिल्ह्यात जाऊन रेशीम शेतीची माहिती मिळविली. रेशीम शेतीसाठी 10 शेतक-यांच्या शेतात 10  टिनशेड उभारल्या गेले.  एवढेच नव्हे तर शेतमालाचे  मार्केटिंग  सामूहिकपणे करण्याचा प्रयोग यशस्वी होत आहे.  ढोरखेडा हे गांव सुमारे दहा वर्षांपूर्वी येथील एकनाथ डवरे यांनी नापिकी व कर्जबाजारी कंटाळून आत्महत्या केली होती त्यामुळे आत्महत्याग्रस्त गाव म्हणून बोलले जात होते .  या वर्षी तब्बल ३२ शेतक-यांनी रेशीम शेती करुन एक नवीन ओळख निर्माण केली. हा सामूहिक शेतक-यांचा उपक्रम पाहता रेशीम प्रकल्पातील शेती तज्ञ दर आठ दिवसांनी येऊन भेट देतात  व मार्गदर्शन करतात. तसेच शिरपूर परिसरातील किनखेड येथील मानकेश्वर पंढरीराव अवचार, देवराव अवचार यांनीसुद्धा रेशीम शेती करुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमांतर्गंत रेशीम विकास प्रकल्पाचा लाभ घेतला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमांतर्गंत रेशीम विकास प्रकल्प
वाशिम जिल्हा रेशीम कार्यालयाच्या अंतर्गत शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम योजना अंतर्गंत रेशीम विकास प्रकल्पासाठी शेतक-यांना रेशीम शेतीसाठी अनुदान दिले जात आहे. यामध्ये किमान एक एकरात तुतीची लागवड करणे आवश्यक आहे. तुतीचे पाने रेशीम कृमी (अळयांना) खाद्य म्हणून  पुरविले जाते. त्या अळयांपासून रेशीम कोष तयार होतो याला प्रतिकिलो ४५० ते ५०० रुपये असा भाव मिळतो. याासाठी शासनातर्फे प्रथमवर्षी १ लाख १० हजार ७८० कुशल अनुदान, दुस-यावर्षी १ लाख ७९ हजार ८९५ अकुशल अनुदान असे एकूण २ लाख ९० हजर ६७५ रुपये ३ वर्षात प्रकल्प किंमत म्हणून देते.

कोसल्याची बंगलोर येथे विक्री  
या रेशीम शेतीतून प्रत्येकाला ९० ते १०० किलो रेशिम कोसल्याचे उत्पन्न होते . या रेशीम कोशल्याला प्रतिकिलो ५०० ते ६००  रुपये बाजार भाव आहे . बंगलोर येथे  रेशीमला चांगला भाव आहे . त्यामुळे येथील शेतकरी सामूहिकरीत्या रेल्वेने आपला शेतमाल बेंगलोरला वषार्तून चार वेळा नेतात. यातून त्याना उत्तम पैसे मिळतात.

एकेकाळी चक्रीवादळाने जरी ढोरखेडा गाव उद्ध्वस्त झाले , तरी विकासाची चक्रे फिरवण्याची जिद्द गांवकºयात होती. त्यामुळे एकीकडे गावाचा चेहरामोहरा बदलत असताना  शेतशिवारात सामूहिक शेतीतून नवीन तंत्रज्ञान यशस्वी होत आहेत . ढोरखेडा इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे . इतर गावातील शेतक-यांनी  सुद्धा आत्महत्येचा विचार मनात न आणता हिंमत घेऊन शेती करावी नविन प्रयोग करावे.- सुनीता बबनराव मेटकरी  सरपंच,  ढोरखेड़ा 

Web Title: First and largest farming experiment in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी