ठळक मुद्देसभापती सानप यांनी दिले ११ हजार धावपट्टीवर सराव

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड - पोलीस भरतीसाठी सराव करणा-या युवकांना धावपट्टी तयार करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी ११ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला.
ग्रामीण व शहरी भागातील गरजू युवक मोठ्या संख्येने पोलीस भरतीकडे वळत आहे. यासाठी आवश्यक तो सराव करता यावा यासाठी रिसोड येथे  जागेश्वर ‘रनिंग ट्रॅक’ (धावपट्टी) तयार करण्यात येत आहे. या कामी अर्थसहाय्य करण्याची मागणी ६० ते ७० युवकांनी केली असता, याची दखल घेत सभापती सानप यांनी ११ हजार रुपयांची मदत केली. यावेळी सानप म्हणाले, ग्रामीण भागातील तरुण हा मेहनती आहे. परंतू, त्यांना योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळे  आजच्या स्पर्धेत तो मागे पडतो. फक्त मार्गदर्शन नसल्यामुळे त्याच्या पदरी निराशा येत असल्याने, यापुढे स्पर्धा परिक्षा, संभाव्य पोलीस प्रक्रिया इत्यादी संदर्भात सर्वस्वी मदत केली जाईल, असे आश्वासन सानप यांनी दिले. ज्यावेळेस हाताला काम नसते आणि घरच्या मंडळीच्या अपेक्षा असतात, अशा वेळी त्या युवकांची अवस्था कशी होते, याची जाणीव मला आहे. कारण मी या सर्व प्रसंगातून आलेला आहे, असे सानप यांनी युवकांना सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न घाबरता  आत्मविश्वासाने जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.