गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात; सिंचनाच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 03:58 PM2019-04-15T15:58:17+5:302019-04-15T15:58:24+5:30

वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे.

Final phase of mud removal; Hope of irrigation | गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात; सिंचनाच्या आशा पल्लवित

गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात; सिंचनाच्या आशा पल्लवित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत सोंडा ता. वाशिम येथील माती नाला बांधातील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, यावर्षी रब्बी हंगमात सिंचन होण्याच्या शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
टंचाईग्रस्त भागात जलसंधारणाची विविध कामे करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) केला जात आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत कारंजा, वाशिम, मालेगाव, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात प्रस्तावित गावांमध्ये जलसंधारणाची कामे होत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे अनेक गावांतील कामे थांबली तर काही ठिकाणी सुरू आहेत.  सोंडा ता.वाशिम येथील एकनाथ क्षीरसागर यांचे शेतात कृषी विभाग  व बीजेएसच्यावतीने माती नाला बांधातील गाळ  काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या बांधातील पाण्यामुळे रब्बी हंगामात सिंचन करणे सुलभ होईल, असा विश्वास परिसरातील शेतकºयांनी व्यक्त केला.

Web Title: Final phase of mud removal; Hope of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.