ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकारजिल्हाधिका-यांनी दखल घेण्याची गरज 

लोकमत न्यूज
वाशिम:- माजी सैनिकाला शासनाकडून मिळालेल्या शेतजमिनीची परस्पर नोंद करण्यात आली आहे. याबाबत माजी सैनिकाच्या विधवा पत्नीने तक्रार करूनही पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. त्यामुळे  राऊत कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अनंता तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला गुरुवारी ५ दिवस झाले आहेत .
माजी सैनिक फकिरा पुंजाजी राऊत यांना १९७१ मध्ये उदरनिर्वाहासाठी मालेगाव तालुक्यातील अनसिंग येथे शासनाकडून जमीन मिळाली आहे. दरम्यान, माजी सैनिक फकिरा राऊत यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांच्या विधवा द्वारकाबाई यांना त्यांच्या जमिनीची प्रल्हाद डिगांबर अढाऊ यांच्या नावाने परस्पर नोंद केल्याचे लक्षात आले. त्यामुळे द्वारकाबाई फकिरा राऊत यांनी याबाबत ३ आॅक्टोबर २००७ ला तत्कालीन जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रारही केली. तथापि, ती जमीन त्यांना मिळाली नाही. त्यानंतर ३० डिसेंबर २०१५  ला सामाजिक कार्यकर्ते अनंता धर्मराज तायडे यांनी याबाबत जिल्हाधिकारी वाशिम निवेदन दिले. वाशिम शहर पोलीस स्टेशनला याबाबत रितसर तक्रारही दिली. मात्र अद्याप राऊत कुटुंबियांना न्याय न मिळाला नाही. त्यामुळे माजी सैनिकाच्या विधवा पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी. अनंता तायडे यांनी ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषण सुरु केले आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सदर प्रकरण महसूल विभागाशी संबंधित असल्याने उपविभागीय महसूल अधिकारी वाशिम यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर प्रकरण मालेगाव तालुक्याशी संबंधित असल्याने उपविभागीय अधिकाºयांकडून कळले.  त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनीच त्यांच्या अधिनस्त अधिकाºयांकडून या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनास आदेशित करावे, असे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे कळविले आहे.