पडताळणीत अडकली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 03:50 PM2019-02-02T15:50:28+5:302019-02-02T15:50:39+5:30

वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात गत महिन्याभरापासून केवळ पडताळणीच केली जात असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार? याची प्रतिक्षा कायम आहे. 

farmers exgratia stuck in verification! | पडताळणीत अडकली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई !

पडताळणीत अडकली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात गत महिन्याभरापासून केवळ पडताळणीच केली जात असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार? याची प्रतिक्षा कायम आहे. 
सन २०१८ मधील खरीप हंगाम जिल्ह्यातील २ लाख १ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. जिल्ह्यात १६ आॅगस्ट २०१८ ते १९ आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. जवळपास ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने कृषी व महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार शासनाकडे सविस्तर अहवाल पाठविण्यात आला होता. तसेच ४८ तासांच्या आत पीकविम्याची जबाबदारी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे शेतकºयांनी नुकसानभरपाई संदर्भात तक्रारही केली होती. त्याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेताची पाहणी पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने केल्यानंतर, या नुकसानाबद्दल केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम शेतकºयांना मंजूर करण्यात आली. पीकविम्याबद्दल वैयक्तिक नुकसान झालेल्या शेतकºयांच्या यादीची पडताळणी पीकविमा कंपनीकडून गत महिनाभरापासून करण्यात येत आहे. अद्याप पडताळणीच सुरू असल्याने नुकसानभरपाईची रक्कम नेमकी केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील ११४० शेतकºयांनी स्थानिक आपत्तीच्या निकषानुसार वैयक्तिक मदतीसाठी पीकविमा कंपनीकडे तक्रार केली होती.  या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पडताळणी करून त्यांच्या खात्यात पीकविम्याबद्दल नुकसान भरपाईची रक्कम जमा होणे आवश्यक आहे.
 


नुकसानग्रस्त शेतकºयांना पीकविम्याबद्दल आर्थिक मदत देण्यासाठी पडताळणी केली जात आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नुकसानभरपाईबाबतची कार्यवाही केली जाईल.  
- राहुल सहांशे,  जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड

Web Title: farmers exgratia stuck in verification!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.