सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:27 PM2018-11-19T17:27:02+5:302018-11-19T17:27:55+5:30

शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.

Farmer demand water for irrigation | सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन

सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.
सिंचनासंदर्भात जिल्हाधिकारी मिश्रा यांना निवेदन ही दिले होते. मात्र अद्याप पर्यंत रब्बी पिकांसाठी पाणी सोडले नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोनल प्रकल्पात बसून आंदोलन केले. सोनल प्रकल्पातून शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी सोनल प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या शेतकरी व शेतकरी पुत्रांनी आंदोलना दरम्यान आपली मागणी लावुन धरली.
कालव्याची डागडूगी करून  १९ नोव्हेंबर रोजी पाणी सोडावे अन्यथा धरणात बसून आंदोलन करू असा इशारा शेतकरी पुत्रांनी ३० आँक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिला होता. तरीही प्रशासनाने कालव्याची पुर्णपणे डागडूजी करून पाणी सोडले नाही.
म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पाण्याअभावी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकापासून आवश्यक तेवढे उत्पन्न मिळाले 
 नाही. रब्बी हंगामात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नूकसान होऊ नये यासाठी परिसरातील शेतकरी, शेतकरी पुत्रांनी कालवे दुरूस्त करून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी केली होती. परंतू प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सद्यस्थितीत सोनल प्रकल्पात १०० टक्के पाणी उपलब्ध आहे.परंतू संबंधित प्रशासनाचे नियोजन नसल्यामूळे शेतकऱ्यांवर जमीन पडीक ठेवण्याची वेळ आलेली आहे. हरभरा,गहू पेरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केलेली आहे.परंतू पाणी उपलब्ध नसल्यामूळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्यांना उपसा सिंचन करण्यास परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी अर्जुन सुर्वे, संतोष राऊत, मारोती पाचे, मारोतराव राऊत, श्रीधर राऊत, रत्नदिप राऊत, गौरव राऊत, नंदूभाऊ येवले, राजकुमार येवले, पवन मुखमाले, गजानन सुर्वे,  संजय मुखमाले, तुळशीराम कस्टे ,हरिदास वाढणकर, शरद सुर्वे, प्रविण सुर्वे, हरिष सुर्वे, मंगेश सुर्वे, घनश्याम सुर्वे, शुभम सुर्वे. यांची उपस्तिथी होती.

Web Title: Farmer demand water for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.