ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना२२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून अर्ज भरण्याची सुविधा 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वंचित राहू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा कारागृहात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
२२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज न भरल्यास कर्जमाफीच्या लाभापासून संबंधित शेतकºयांना वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले, कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा सामान्य रुगणालयात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाशिम कारागृहातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या कैद्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कारागृहात सुध्दा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर आॅनलाईन अर्ज भरले जातात. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झालेले अनेक शेतकरी आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकºयाला कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयेपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.
बँकेमध्ये आॅफलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांनी सुद्धा आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र शेतकºयाने घेतलेले पीक कर्ज कोणत्याही बँकेचे असले तरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी भरण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जांमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या त्रुटींची दुरुस्तीही २२ सप्टेंबर २०१७ पर्यंतच करणे आवश्यक आहे. संबंधित शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.