भीषण पाणीटंचाईचा फळबागांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 06:20 PM2019-05-06T18:20:43+5:302019-05-06T18:20:49+5:30

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे.

Extreme water scarcity hit the fruit gardens | भीषण पाणीटंचाईचा फळबागांना जबर फटका

भीषण पाणीटंचाईचा फळबागांना जबर फटका

Next

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत.
विपरित हवामान, पाण्याची कमतरता, अद्ययावत तंत्रज्ञानाविषयीच्या मार्गदर्शनाचा अभाव आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम वºहाडात फळबागांच्या क्षेत्रात कमालीची घट आली आहे. अशाही स्थितीत काही शेतकऱ्यांनी तग धरून फळबागा जीवंत ठेवण्याची केविलवाणी धडपड चालविली. मात्र, गतवर्षी पर्जन्यमानात झालेली घट, त्यामुळे यंदा उद्भवलेली भीषण पाणीटंचाई आणि तापमानाने गाठलेल्या उच्चांकामुळे आहे, त्या फळबागा देखील करपण्याच्या मार्गाप्रत पोहचल्या आहेत.

फळबाग लागवड योजनेतील अनुदान अपुरे!
फळबागांचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने अंमलात आणलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचाही अपेक्षित फायदा झालेला नाही. या योजनेंतर्गत तालुकानिहाय केवळ २४ लाख रुपये अनुदान मंजूर असून अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कितीतरी पटीने अधिक राहत आहे. त्यामुळे ही योजना जणू मृगजळ ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच!

शेतांमध्ये फळपिकांची लागवड साधारणत: पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. मात्र, प्रतिकुल परिस्थितीमुळे फळबागांनी दिलेला दगा आणि यंदा उद्भवलेल्या तीव्र स्वरूपातील पाणीटंचाईमुळे आगामी काळात फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Extreme water scarcity hit the fruit gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.