पार्कींगमध्ये अतिक्रमण; वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 03:49 PM2018-11-12T15:49:52+5:302018-11-12T15:50:13+5:30

वाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्कींगचा प्रश्न बऱ्यापैकी पालीका प्रशासनाने सोडला असला तरी शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे पार्कींगमध्येच चक्क अतिक्रमण केल्या जात असल्याने वाहनधारक त्रस्त झालेले दिसून येत आहेत.

Encroachment in parking; Vehicle plagued | पार्कींगमध्ये अतिक्रमण; वाहनधारक त्रस्त

पार्कींगमध्ये अतिक्रमण; वाहनधारक त्रस्त

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्कींगचा प्रश्न बऱ्यापैकी पालीका प्रशासनाने सोडला असला तरी शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे पार्कींगमध्येच चक्क अतिक्रमण केल्या जात असल्याने वाहनधारक त्रस्त झालेले दिसून येत आहेत.
शहरातील अस्ताव्यस्त झालेली वाहतूक व वाटेल तेथे वाहने उभी करुन देण्याच्या प्रकाराला शहरवासी पूर्णपणे कंटाळले होते. यामुळे दररोज वाद होण्याच्या प्रकारात होत असलेली वाढ बघता नगरपरिषदेने पुढाकार घेत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी खासगी व्यक्तीकडे याची जबाबदारी देवून पार्कींग व्यवस्था सुरळीत करण्यात आली. रस्त्यावर वाहने उभी आढळल्यास होणारा दंड पाहता नागरिकांनाही .
पार्कींगमध्ये वाहने उभी करण्याची सवय लागली. परंतु आता पुन्हा वाहने उभे कुठे करावेत असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे, कारण चक्क लघुव्यावसायिकांनी पार्कींगच्या जागेतच अतिक्रमण करुन आपली दुकाने थाटल्याने अडचण निर्माण झाली आहे.
याकडे मात्र शहरवाहतूक शाखेचे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे. नगरपरिषदेने पार्कींगची व्यवस्था केल्याने अर्धेअधिक शहर वाहतूक शाखेचे काम कमी झाले असतांना आता साधे पार्कींगमध्ये अतिक्रमण करणाºयांना हटविण्यात येत नसल्याने शहर वाहतूक शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

अतिक्रमण हटविण्यास चुप्पी
पार्कींगमध्ये अतिक्रमण केल्यानंतर ते हटविण्यासाठी कोणीही पुढाकार घेतांना दिसून येत नाही. यासाठी सर्वांनीच चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे. पार्कींगमध्ये वाहने लावण्यावरुन व फेरीवाले बसत असतांना वाद निर्माण होत आहे. हे अतिक्रमण होवू नये यासाठी मात्र नगरपरिषद, शहरवाहतूक शाखा चुप्पी साधून आहे.

Web Title: Encroachment in parking; Vehicle plagued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.