वाशिम जिल्ह्यात नवदुर्गेला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:56 PM2018-10-19T15:56:19+5:302018-10-19T15:56:41+5:30

वाशिम : वाशिमसह ग्रामीण भागात १९ आॅक्टोबर रोजी दुर्गादेवींना ढोल, ताशाच्या गजरात उत्साहात निरोप देण्यात आला. 

The emotional fairwell to Navadurga in Washim district | वाशिम जिल्ह्यात नवदुर्गेला भावपूर्ण निरोप

वाशिम जिल्ह्यात नवदुर्गेला भावपूर्ण निरोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिमसह ग्रामीण भागात १९ आॅक्टोबर रोजी दुर्गादेवींना ढोल, ताशाच्या गजरात उत्साहात निरोप देण्यात आला. 
यावर्षी शहर व ग्रामीण भागात एकूण ४९० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची नोंद झाली असून त्यापैकी ४७४ दुर्गोत्सव मंडळांनी विधीवत दुर्गादेवीची स्थापना केली होती. गेले नऊ दिवस रास गरबा, दांडीयासह अनेक धार्मिक कार्यक्रमांनी गाजत असलेल्या नवरात्रौत्सवाची सांगताही  १९ आॅक्टोबरला दुर्गामातेच्या विसर्जनाने झाली. विविध दुर्गामंडळांनी ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत मिरवणुकीत सहभाग नोंदविला. 
शिरपूर येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून उत्साहात नवदुर्गा मिरवणुकीला सुरुवात झाली. गावामध्ये एकूण १४ ठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात आला. सर्वच मंडळांनी आकर्षक असे देखावे निर्माण केले होते. ढोल ताशाच्या गजरात अनेकांनी ताल धरला होता. काही मंडळांनी रथावर दुर्गादेवी विराजमान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. रथावर विराजमान देवी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीमध्ये भाविकांसह गावातील सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कारंजा लाड येथील दुर्गाविसर्जन १९ आक्टोबर रोजी शांततेत झाले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने  ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. नऊ दिवस मनोभावे पुजा करुन अनेक दुर्गोत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम राबवित नवरात्रौत्सव साजरा केला.

Web Title: The emotional fairwell to Navadurga in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.