Distribution of grains to families of suicidal farmers | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाना धान्य वाटप
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाना धान्य वाटप


लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यात सततच्या नापीकीमुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने अधिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  त्यांच्या कुटूंबाना मदत व्हावी यासाठी शिवसेनचेवतीने किराणाचे वाटप करण्यात आले. 
तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी जवळपास  आपले जिवन संपविले . यामुूळे शेतकऱ्यांचे कुटूंब उघडयावर पडले.  त्या कुटूंबाना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार किराणा वाटप करण्यात आला.   सुमेध गोपींचंद राठोड ,  सुधाकर उत्तम राठोड , कमलाताई नामदेव टाले, हिम्मत सुर्यभान सोनाने, रविंद्र घनसिंग राठोड, वकील वामन आडे, गणेश अशोक वानखेडे, किसन शिकारे  या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तालुका शिवसेना कार्यालयासमोर किरणा वाटप करण्यात आला.  या वेळी शिवसेना तालुका प्रमुख रवि पवार, युवा सेना तालुका प्रमुख राउत, उपतालुका प्रमुख राजे नेमानी, अजय देशमुख, अमर उजवे, सर्कल प्रमुख राठोड, चंद्रकांत राठोड, प्रविण इंगोले, पवन राउत, विशद डामरे, उमेश शिंदे, अजय कटारे, मुन्ना टोलमरे, सिद्धा शिरे, किसन वापल, कुणाल राठोड, आशितोष लवरे, निलेश मनवर, अतुल आडुले व  शिवसैनिक होते.


Web Title: Distribution of grains to families of suicidal farmers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.