शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:29 PM2019-06-24T13:29:02+5:302019-06-24T13:29:26+5:30

रिसोड (वाशिम) : रिसोड शहरामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक  स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली.

Discussion on various topics, meeting of peace committee | शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा

शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक  स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली. यावेळी शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, चोरीच्या घटनांवर नियंत्रण, दारूविक्रेत्यांविरूद्ध कारवाई आदी विषयांवर चर्चा झाली. 
आठ दिवसांपुर्वी रिसोड शहरात घडलेल्या दोन गटातील मारहाणीच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर पोलीस प्र्रशासनाने  रविवारी शांतता समितची बैठक घेतली.  बैठकिच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.पवन बनसोड होते. व्यासपिठावर पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक ठाणेदार अनिल ठाकरे यांनी केले. यावेळी शांतता समिती सदस्य बबनराव मोरे, रोहीणी खंडारे, फैजलभाई, दिलीप देशमुख, जयंत वसमतकर, नगरसेविका पप्पीबाई कदम, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मदनसेठ बगडीया, माया जुमडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी डॉ.बनसोड म्हणाले की, या घटनेमध्ये दोषी कोण आहे याबाबत तपास सुरु आहे. राजकीय दबावाला बळी पडणार नाही, अन्याय झाला असेल तर तेथे आम्ही न्ििश्चतच न्याय देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी खंडणीबहाद्दर, दारू विक्रेते, सीसीटीव्ही, चोरीच्या घटनांवर आळा आदी मुद्दे उपस्थित झाले. डॉ. बन्सोड म्हणाले की, खंडणी बहाद्दराविरुध्द गुन्हे दाखल केले जातील तसेच गावामध्ये दारु विक्रेताविरुध्द कारवाई करु, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा कुणी गैरफायदा घेवु नये, तडीपार मंडळी या क्षेत्रामध्ये राहता कामा नये, शहरामध्ये सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत अ‍ॅक्शन प्लॅन आखणार असून, डॉ. आंबेडकर चौक व लोणी फाटा येथे पोलिसांची संख्या वाढविली जाईल, असे सांगितले. यावेळी शांतता समितीचे सदस्य, नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक, व्यापाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Web Title: Discussion on various topics, meeting of peace committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.