नैसर्गिक आपत्तीने बाधित आपद्ग्रस्तांना मिळणार तातडीने अर्थसहाय्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:10 PM2018-06-13T15:10:59+5:302018-06-13T15:10:59+5:30

वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

Disaster affected by natural calamities will get immediate help! | नैसर्गिक आपत्तीने बाधित आपद्ग्रस्तांना मिळणार तातडीने अर्थसहाय्य!

नैसर्गिक आपत्तीने बाधित आपद्ग्रस्तांना मिळणार तातडीने अर्थसहाय्य!

Next
ठळक मुद्देनडीआरएफच्या दरानुसार जिल्हास्तरावरून तातडीने मदत वाटप करण्यासाठी आवश्यक निधी जिल्हाधिकाºयांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.यासाठी शासनस्तरावर मंत्रीमंडळ उपसमितीचे गठण करण्यात आले असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यासाठी शासनस्तरावर मंत्रीमंडळ उपसमितीचे गठण करण्यात आले असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ)च्या मार्गदर्शन सुचनानुसार विविध स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधीत होणाºयांना द्यावयाच्या मदतीचे दर व निकष यापूर्वीच ठरविण्यात आलेले आहेत. यासोबतच अवेळी पाऊस, अतिवृष्टीने जमिनी खरडून जाणे, वीज कोसळून जिवीत वा वित्त हानी होणे, घरांची पडझड, पशूधनांचा मृत्यू याप्रकरणी एनडीआरएफच्या दरानुसार जिल्हास्तरावरून तातडीने मदत वाटप करण्यासाठी आवश्यक निधी जिल्हाधिकाºयांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. यासाठी अध्यक्ष आणि सदस्य सचिवांसह ८ जणांचा समावेश असलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीकडे आपद्ग्रस्तांसाठी अपेक्षित मदतनिधीस मंजूरात दर्शविण्याचे अधिकार असणार आहेत.

Web Title: Disaster affected by natural calamities will get immediate help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.