वाशिम जिल्ह्यातील नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 02:56 PM2019-06-07T14:56:21+5:302019-06-07T14:56:38+5:30

वाशिम जिल्ह्यातील मुसळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सहा आरोग्य उपकेंद्रांसाठी मिळून ३३ पदांच्या निर्मितीस ६ जूनच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. 

Design for new health organizations in Washim district | वाशिम जिल्ह्यातील नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती

वाशिम जिल्ह्यातील नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यातील बांधकाम पुर्ण झालेल्या, एकूण ७१ नवीन आरोग्य संस्थांसाठी नियमीत पदे, काल्पनिक कुशल पदे  आणि काल्पनिक अकुशल पदे निर्माण करण्यासह संबंधित आरोग्य संस्थांचे कामकाज सुरु करण्यास शासनाने ६ जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली असून, यात वाशिम जिल्ह्यातील मुसळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सहा आरोग्य उपकेंद्रांसाठी मिळून ३३ पदांच्या निर्मितीस ६ जूनच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. 
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने २७ जून २०१२, १७ जानेवारी २०१३ आणि ९ जून २०१४ च्या शासननिर्णयानुसार आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण क्षेत्रात नविन आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली होती. सदर आरोग्य संस्थांचे बांधकाम पूर्ण झाले असून, या आरोग्य संस्थांसाठी १६ जानेवारी २००३ आणि ३० डिसेंबर २००६ च्या निर्णयांस अनुसरून नविन आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाºया पदांचा आकृतीबंधही तयार करण्या आणि काल्पनिक अकुशल पदे निर्माण करण्यासह संबंधित आरोग्य संस्थांचे कामकाज सुरु करण्यास शासनाने ६ जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. यात जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील  शेलू (बु.) आणि वारा जहॉगिर,, मालेगाव तालुक्यातील भौरद आणि कोळगाव, रिसोड तालुक्यातील येवता आणि मानोरा तालुक्यातील रुई येथील आरोग्य उपकें द्रांचा समावेश असून, या उपकेंद्रात नियमीत पदांपैकी ए.एन.एम., गट-क, आरोग्य सेवक, गट-क , तसेच काल्पनिक कुशल पदांपैकी अंशकालीन स्त्री परिचर अशी प्रत्येकी एक मिळून तीन पदांची स्थापना करण्यात आली आहे. 
 
मुसळवाडी आरोग्य केंद्रासाठी १५ पदे
बिगर आदिवासी उपयोजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील प्राथमिक आरोग्य कें द्रासाठी नियमीत पदांपैकी २ वैद्यकीय अधिकारी गड-ड, १ पुरुष आरोग्य सहाय्यक गट-क , १ स्त्री आरोग्य सहाय्यक गट-क, १ ए.एन.एम गट, अशी एकूण पाच, तर काल्पनिक कुशल पदांपैकी १ पुरुष आरोग्य सहाय्यक, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ औषधनिर्माण अधिकारी, १ कनिष्ठ लिपिक गट-क, १ वाहन चालक, १ स्त्री परिचर गट-ड आणि ३ पुरुष परिचर गट-ड मिळून एकूण ९, तर काल्पनिक अकुशल पदांपैकी १ सफाई कामगार गट-ड, अशी तीन संवर्गातील मिळून एकूण १५ पदे निर्मितीस मंजूरी देण्यात आली आहे. आता पदांची स्थापना झाल्याने येत्या काही दिवसांत हे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित होऊन ग्रामीण जनतेला आरोग्यसुविधा प्राप्त होणार आहेत.

Web Title: Design for new health organizations in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.