विभागीय आयुक्तांनी घेतला वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 05:28 PM2019-05-24T17:28:46+5:302019-05-24T17:29:07+5:30

संबंधित विभागांनी केलेली पूर्वतयारी याविषयीचा आढावा विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी घेतला.

Departmental Commissioner reviewed tree plantation campaign! | विभागीय आयुक्तांनी घेतला वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा !

विभागीय आयुक्तांनी घेतला वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनामार्फत यावर्षी राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी समन्वय ठेवून योग्य व परिपूर्ण नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वृक्ष लागवड मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपवनसंरक्षक सुमंत सोळंकी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उत्तम फड यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त सिंह म्हणाले, वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत प्रत्येक विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक जमिनीची माहिती तसेच प्रत्यक्ष खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व शासकीय विभागांनी या कामाला गती द्यावी. ज्या शासकीय विभागांकडे वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध नाही, अशा विभागांना शहरी अथवा ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर वृक्षारोपण करता येईल. या जमिनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात नव्याने होत असलेल्या महामार्गांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्याचे नियोजन संबंधित विभागांनी करावे. तसेच जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या सर्व मध्यम व लघु प्रकल्पांच्या परिसरातही वृक्षारोपण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विविध शासकीय विभागांना देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट व त्यानुसार संबंधित विभागांनी केलेली पूर्वतयारी याविषयीचा आढावा विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी घेतला.

Web Title: Departmental Commissioner reviewed tree plantation campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम