मानोरा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिका-यांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 07:26 PM2017-11-17T19:26:18+5:302017-11-17T19:30:35+5:30

ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणा-या आरोग्य उपकेंद्रांत वैद्यकीय अधिका-यांची वाणवा जाणवत आहे. एकट्या मानोरा तालुक्यात १० वैद्यकीय अधिका-यांसह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि परिचर मिळून ३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.

Department of Medical Officers in Manora Health Department | मानोरा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिका-यांची वाणवा

मानोरा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिका-यांची वाणवा

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण रुग्णांची गैरसोयआरोग्य सेवक, सेविका,  परिचराची पदेही रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणा-या आरोग्य उपकेंद्रांत वैद्यकीय अधिका-यांची वाणवा जाणवत आहे. एकट्या मानोरा तालुक्यात १० वैद्यकीय अधिका-यांसह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि परिचर मिळून ३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.
मानोरा तालुक्यात कुपटा, शेंदुरजना, पोहरादेवी येथे आरोग्य केंद्र आहेत. तर इतर अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहेत. या सर्व केंद्रांत ग्रामीण भागातील रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी कर्मचा-यांची वाणवा आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणा-या रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, रिक्त पदांमुळे संबंधित कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांना गोरगरीब रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. कोणत्याही आरोग्य केंद्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय अधिका-यांची १० पदे मानोरा तालुक्यात रिक्त आहेत. त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी पदाचाही समावेश असून, या पदाचा प्रभार शेंदुरजना येथील वैद्यकीय अधिकाºयांकडे दिला आहे. कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन, पोहरादेवी येथील दोन, तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांसह हतर सात वैद्यकीय अधिका-यांची येथे वाणवा आहे. त्याशिवाय कुपटा येथे दोन आरोग्य सेवक, दोन आरोग्य सेविका, दोन परिचराची पदे रिक्त आहेत.  शेंदुरजना येथे दोन परिचर, दोन आरोग्य सेवक आणि एक आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. पोहरादेवी येथेही दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सेवक, दोन परिचराची पदे रिक्त आहेत. अपुºया कर्मचाºयांमुळे कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचा-यांवर कामाचा मोठा ताण येत असून, ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यांत मोठा खर्च करावा लागत आहे. 

आरोग्य सेविकेचे पद सहा महिन्यांपासून रिक्त 
मानोरा तालुक्यातील हिवरा खु. येथे असलेल्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविके चे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या आरोग्य उपकेंद्राला जोडण्यात आलेल्या आठ गावांतील गरोदर महिला, स्तनदा मातांसह इरत महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आली असली तरी, त्या केवळ लसीकरण शिबिर, पोलिओ लसीकरण अथवा इतर विशेष अभियानापुरत्याच या ठिकाणी भेट देत असल्याने त्याचा फारसा फायदा परिसरातील महिला रुग्णांना होत नाही. या ठिकाणी आरोग्य सेवकाचे पदही रिक्त असल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कार्यरत आरोग्य सेविकेची बदली झाल्यानंतर हिवरा आरोग्य केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन प्रभारी आरोग्य अधिका-यांनी संबंधित आरोग्य सेविकेला दोन महिने कार्यमूक्त केले नव्हते; परंतु अखेर त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोग्य सेविकेला कार्यमूक्त करावे लागले. तथापि, त्या ठिकाणी दुसºया आरोग्य सेविकेची नियुक्ती मात्र करण्यात आली नाही. 
 

Web Title: Department of Medical Officers in Manora Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.