शिरपूर जैन येथील कुस्त्यांच्या महासंग्रामात दिल्लीचा कृष्णकुमार ठरला विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:35 PM2018-02-19T14:35:41+5:302018-02-19T14:40:45+5:30

शिरपूर जैन : येथील आेंकार कुस्ती मंडळाच्यावतीने आयोजित कुस्त्यांच्या महासंग्रामात १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा कृष्णकुमार याने हिंगोलीच्या गजानन यास चित करुन विजेता ठरले व पहिले बक्षीस ७१ हजार व किलो चांदीच्या गदाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळविला.

Delhi's Krishnakumarar win wrestiling championship at Shirpur Jain | शिरपूर जैन येथील कुस्त्यांच्या महासंग्रामात दिल्लीचा कृष्णकुमार ठरला विजेता

शिरपूर जैन येथील कुस्त्यांच्या महासंग्रामात दिल्लीचा कृष्णकुमार ठरला विजेता

Next
ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त १७ व १८ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांची दंगल ओंकार कुस्ती मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली होती. या दंगलीमध्ये हिंगोली जालना, वाशिम, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, कुर्डवाडी सह मध्यप्रदेश हरियाणा व दिल्ली येथून शेकडो पहेलवान सहभागी झाले होते. ७१ हजार व गणेश घोडमोडेकडून १ किेलो चांदीचा गदा बक्षिस असलेले पहिले बक्षिस दिल्लीच्या कृष्णकुमारने हिंगोलीच्या गजानन पैलवान चित करून पटकाविले.


शिरपूर जैन : येथील आेंकार कुस्ती मंडळाच्यावतीने आयोजित कुस्त्यांच्या महासंग्रामात १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा कृष्णकुमार याने हिंगोलीच्या गजानन यास चित करुन विजेता ठरले व पहिले बक्षीस ७१ हजार व किलो चांदीच्या गदाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. रात्री १२.३० वाजता या सामन्याचा निकाल लागला.
स्थानिक जानगीर महाराज संस्थानच्या क्रिडा मैदानावर महाशिवरात्रीनिमित्त १७ व १८ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांची दंगल ओंकार कुस्ती मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली होती. या दंगलीमध्ये हिंगोली जालना, वाशिम, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, कुर्डवाडी सह मध्यप्रदेश हरियाणा व दिल्ली येथून शेकडो पहेलवान सहभागी झाले होते. १७ फेब्रुवारी रोजी संस्थानचे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या हस्ते दंगलचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरिक्षक हरिष गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती . १८ फेब्रुवारी रोजीची दंगल महाराष्टÑातील नामवंत पहेलवान ५१ गावचे मानकरी असलम काजी, से.नि.पोलिस आयुक्त रामराव वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत सुरु झाली . रात्री उाशिरा पर्यंत चाललेल्या कुस्त्यांच्या महासंग्रामत उमेश इंगोले, रमेश इंगोले, यांच्यातर्फे प्रायोजित ७१ हजार व गणेश घोडमोडेकडून १ किेलो चांदीचा गदा बक्षिस असलेले पहिले बक्षिस दिल्लीच्या कृष्णकुमारने हिंगोलीच्या गजानन पैलवान चित करून पटकाविले. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Web Title: Delhi's Krishnakumarar win wrestiling championship at Shirpur Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.