अखर्चित निधीची जबाबदारी निश्चित करा ! आमदार रणधीर सावरकरांचे वाशिम जि. प. सीईओं ना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 06:37 PM2018-01-16T18:37:30+5:302018-01-16T18:41:21+5:30

वाशिम - वाशिम जिल्ह्यात १७ ते १९ जानेवारीदरम्यान पंचायत राज समितीचा दौरा असून, या दौऱ्यादरम्यान सन २०१२-१३ या वर्षातील अखर्चित निधीची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना पंचायत राज समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.

Define the responsibility of the financed fund! MLA Randhir Savarkar | अखर्चित निधीची जबाबदारी निश्चित करा ! आमदार रणधीर सावरकरांचे वाशिम जि. प. सीईओं ना पत्र

अखर्चित निधीची जबाबदारी निश्चित करा ! आमदार रणधीर सावरकरांचे वाशिम जि. प. सीईओं ना पत्र

Next
ठळक मुद्दे१७ ते १९ जानेवारीदरम्यान या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सावरकर यांनी केल्या. यासंदर्भात १५ जानेवारी रोजी सहा मुद्यांच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले. भ्रष्टाचारासंदर्भातील प्रलंबित असलेली चौकशी पूर्ण करावी आदी सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केल्या. 

वाशिम - वाशिम जिल्ह्यात १७ ते १९ जानेवारीदरम्यान पंचायत राज समितीचा दौरा असून, या दौऱ्यादरम्यान सन २०१२-१३ या वर्षातील अखर्चित निधीची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना पंचायत राज समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली. यासंदर्भात १५ जानेवारी रोजी सहा मुद्यांच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले.

प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १७ ते १९ जानेवारीदरम्यान या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सावरकर यांनी केल्या. अकोला जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या विनायक कांगटे यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, रजा कालावधी वेतन तसेच प्रलंबित देयक तातडीने निकाली काढण्यात यावे, ग्रामपंचायत कायद्याच्या अनुषंगाने ले-आऊट किंवा गावठाणमधील जागेबाबात ग्रामपंचायतच्या अधिकारांवर हस्तक्षेप होऊ नये, सन २०१२-१३ या वर्षातील अखर्चित निधीची जबाबदारी निश्चित करावी, मालेगाव तालुक्यातील माळसूर ग्रामपंचायतअंतर्गत दलित वस्तीमधील काम दलित वस्तीत न करता इतरत्र करण्यात आल्याने यासंदर्भात चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, चिंचाबाभर येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, मंगरूळपीर तालुक्यातील फाळेगाव येथील ग्रामसचिवाची गैरप्रकार, भ्रष्टाचारासंदर्भातील प्रलंबित असलेली चौकशी पूर्ण करावी आदी सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केल्या. 

Web Title: Define the responsibility of the financed fund! MLA Randhir Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.