कर्जमाफीत बोळवण, वाशिमच्या संतप्त शेतकऱ्याने ७० फूट ‘टॉवर’वर चढून केले आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:34 PM2018-01-22T16:34:17+5:302018-01-22T16:51:24+5:30

वाशिम: थकबाकीदार शेतकऱ्यांना  दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली; परंतु जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांची २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देवून शासनाने बोळवण केली. या धोरणाविरूद्ध संतप्त झालेल्या कोळगाव (ता.मालेगाव) येथील युवा शेतकरी विजय शेंडगे यांनी सोमवार, २२ जानेवारीला जिल्हा परिषद परिसरातील पवनऊर्जा यंत्राच्या ‘टॉवर’वर तब्बल ७० फुट वर चढून आंदोलन केले.

Debt relief; Washim agitated activist climbs to 70 feet towers! |  कर्जमाफीत बोळवण, वाशिमच्या संतप्त शेतकऱ्याने ७० फूट ‘टॉवर’वर चढून केले आंदोलन!

 कर्जमाफीत बोळवण, वाशिमच्या संतप्त शेतकऱ्याने ७० फूट ‘टॉवर’वर चढून केले आंदोलन!

googlenewsNext
ठळक मुद्दे कर्जमाफी धोरणामुळे हताश झालेल्या विजय शेंडगे या शेतकऱ्याने १५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कृषी मंत्री, पालकमंत्री आदिंना निवेदन दिले होते. दखल न घेतल्याने अखेर सोमवारी प्रशासनाची नजर चुकवत शेतकरी शेंडगे यांनी जिल्हा परिषद परिसरातील पवनऊर्जा ‘टॉवर’वर चढून आंदोलन केले.शेंडगे यांना खाली उतरविण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलिस विभागाला तब्बल दोन तास आटापिटा करावा लागला.

वाशिम: थकबाकीदार शेतकऱ्यांना  दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली; परंतु जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांची २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देवून शासनाने बोळवण केली. या धोरणाविरूद्ध संतप्त झालेल्या कोळगाव (ता.मालेगाव) येथील युवा शेतकरी विजय शेंडगे यांनी सोमवार, २२ जानेवारीला जिल्हा परिषद परिसरातील पवनऊर्जा यंत्राच्या ‘टॉवर’वर तब्बल ७० फुट वर चढून आंदोलन केले. दरम्यान, शेंडगे यांना खाली उतरविण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलिस विभागाला तब्बल दोन तास आटापिटा करावा लागला.
शासनाने यंदा थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम देवून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाने अवलंबिला. या धोरणामुळे हताश झालेल्या विजय शेंडगे या शेतकऱ्याने १५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कृषी मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार अमीत झनक आणि मालेगाव तहसीलदार आदिंना निवेदन दिले होते. याशिवाय मालेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनाही यासंदर्भात कल्पना देण्यात आली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर सोमवारी प्रशासनाची नजर चुकवत शेतकरी शेंडगे यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरातील पवनऊर्जा ‘टॉवर’वर चढून आंदोलनास सुरूवात केली. यावेळी शेंडगे यांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

महसूल विभाग, पोलिस प्रशासनाची मनधरणी!
शेतकरी विजय शेंडगे याने ‘टॉवर’वरून खाली उतरण्यासाठी महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रियंका मीना, तहसीलदार बळवंत अरखराव यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेंडगे यांची मनधरणी केली. सरतेशेवटी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू चौधरी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने शेंडगे यांनी आंदोलन मागे घेत ‘टॉवर’वरून खाली उतरण्याचे मान्य केले.

‘अग्निशमन’च्या सहाय्याने उतरविले ‘टॉवर’वरून!
जिल्हा परिषद परिसरात घडलेल्या या आगळ्यावेगळ्या घटनेची माहिती कळताच नगर परिषदेचे अग्निशमन दल बचाव यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावरील शिडीच्या सहाय्याने अखेर आंदोलक शेतकरी विजय शेंडगे यांना खाली उतरविण्यात आले. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती.


ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेऊन परतफेड केली नाही, त्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि सावकारी कर्ज, उसणवारीचे व्यवहार करून कर्जाचे नियमित हप्ते अदा करणाºया शेतकऱ्यांना  मात्र प्रोत्साहन भत्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन शासनाने इमानदार शेतकऱ्यांची बोळवण केली. बँकांच्या लेखी आमच्याकडे थकित कर्ज नसले तरी, कर्ज फेडण्यासाठी उसणवारी केली. शासनाला मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नसल्यानेच आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.
- विजय शेंडगे
आंदोलक शेतकरी

Web Title: Debt relief; Washim agitated activist climbs to 70 feet towers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.