Datta Jayanti festival celebrated : Thousands of devotees took great advantage of Mahaprashad | मंगरुळपिरात दत्त जयंती उत्सव :हजारो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

ठळक मुद्देविश्व जीवन ग्रंथांचे  सामूहिक पठण

 

मंगरुळपीर : शहरातील बायपास रोडवरील दत्त कॉलनी येथील दत्त मंदिरात ४ डिसेंबर रोजी दुपारी  १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो भाविक भक्तांनी  लाभ घेतला.

ंमंगरुळपीर शहरातील दत्त कॉलनी येथील साला प्रमाणे यावर्षी सुध्दा  ३ डिसेंबर रोजी मोठ्या उतसाहात दत्तजन्म उत्सव साजरा करण्यात आला. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून १० वाजेपर्यंत होमहवन व १० ते १ वाजेपर्यंत विश्व जीवन ग्रंथाचे सामुहिक पठण , नवव्या अध्यायाचा स्वाकार गोवर्धन महाराज  राऊत, सिताराम महाराज दबडे, रामदास महाराज महल्ले,  जोशी महाराज डव्हा यांचेहस्ते करण्यात येवुन लगेचच दुपारी १ वाजतापासुन महाप्रसाद वितरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी रांगेमध्ये  शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी या परिसरातील नगरसेवक आकाश प्रकाश संगत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह दिवसभर महाप्रसादाचे वितरण करुन घंटागाड्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती .यावेळी गजानन विटकरे, गोपाल मिसाळ, बाळु मुंढरे, हिसेकर महाराज, मानेकर, प्रकाश संगत,  गजानन पाटील, इगंोले, हरिलाल बनचरे, यांचेसह परिसरातील व दत्त मंदिर कमेटीच्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.