रिसोड तालुक्यातील धरणे तहानलेलीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:28 PM2018-06-24T15:28:47+5:302018-06-24T15:31:09+5:30

रिेसोड: वाशिम जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असताना रिसोड तालुक्यात मात्र जून महिना संपत आला तरी अपेक्षीत पाऊस पडलेला नाही.

dams in Risod taluka no gain in water lavel | रिसोड तालुक्यातील धरणे तहानलेलीच 

रिसोड तालुक्यातील धरणे तहानलेलीच 

Next
ठळक मुद्दे तालुक्यात २४ जूनपर्यंत केवळ १५.८४ मि.मी. पाऊस पडला आहे.पाऊस कमी असल्याने तालुक्यातील धरणांची पातळीही वाढली नसून, सद्यस्थितीत तालुक्यातील १८ प्रकल्पांमध्ये ९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.


रिेसोड: वाशिम जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असताना रिसोड तालुक्यात मात्र जून महिना संपत आला तरी अपेक्षीत पाऊस पडलेला नाही.  तालुक्यात २४ जूनपर्यंत केवळ १५.८४ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, विहिरी, कूपनलिका आणि धरणे अद्यापही कोरडीच आहेत.
रिसोड तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. तालुक्याच्या पावसाची सरासरी तब्बल ११२ मि.मी. नोंदविण्यात आली होती, तर गतवर्षी रिसोड तालुक्यात १ जून ते २४ जूनदरम्यान २५५.७० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा याच कालावधित केवळ ११८.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अर्थात गतवर्षीपेक्षा यंदाचे प्रमाण निम्म्याहून कमी आहे. त्यातही यंदा पडलेला पाऊस हा सार्वत्रिक स्वरुपाचा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. त्यातच पाऊस कमी असल्याने तालुक्यातील धरणांची पातळीही वाढली नसून, सद्यस्थितीत तालुक्यातील १८ प्रकल्पांमध्ये ९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यातही तालुक्यातील चार प्रकल्प अद्यापही कोरडे अर्थात शुन्य टक्के उपयुक्त जलसाठा असलेले आहेत. येत्या चार, पाच दिवसांत तालुक्यात जोरदार पाऊस न झाल्यास खरीपाच्या पेरण्यांना अधिक विलंब होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.

Web Title: dams in Risod taluka no gain in water lavel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.