मालेगाव तालुक्यात संजय गांधी निराधार समिती सभेत १२७  प्रकरणे मंजूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 4:01pm

मालेगाव : मालेगाव तालुका संजय गांधी  निराधार समितीची सभा बुधवारी झाली असून, यावेळी १२७ प्रकरणे मंजूर झाली आहेत, अशी माहिती समिती अध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली. 

मालेगाव : मालेगाव तालुका संजय गांधी  निराधार समितीची सभा बुधवारी झाली असून, यावेळी १२७ प्रकरणे मंजूर झाली आहेत, अशी माहिती समिती अध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली. 

गोरगरीब, वृद्ध, दिव्यांग, निराधार आदींना शासनातर्फे दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेच्या लाभार्थींची निवड ही संजय गांधी  निराधार समितीतर्फे केली जाते. यावर्षीपासून अर्जप्रक्रिया ही आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस  प्रकरणांना  मोठ्या प्रमाणात आळा बसत असल्याचा दावा समितीने केला. बुधवारी पार पडलेल्या सभेत संजय गांधी निराधार योजना दिव्यांग १६ प्रकरणे मंजूर  झाली आहेत.  विधवा १९ आणि  शेती असलेल्या दिव्यांग विधवा ११ अर्ज  मंजूर झाले आहेत. श्रावण बाळ योजनेचे २१ अर्ज मंजूर झाले आहेत. श्रावण बाळ दारिद्र्य रेषेखाली नसलेले ५५ अर्ज मंजूर झाले आहेत. यावेळी तहसीलदार राजेश वजीरे, समिती अध्य्क्ष मारोतराव लादे, सदस्य सुनील घुगे, नितिन काळे, अमोल माकोडे, संगीता राऊत, दीपक दहात्रे, संजय केकन, साहेबराव नवघरे, डॉ ढवळे यांच्यासह तहसिल कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

यापुढे कोणत्याही दलालांशी संपर्क न करता लाभार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे. पुढील सभा ६ डिसेंबर रोजी असून, ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समिती अध्यक्ष मारोतराव लादे यांनी केले.

संबंधित

लवकरच साजरा होणार आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन - श्रीपाद नाईक
कुणाची झाली भयमुक्ती?
लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त
अमरावती जिल्ह्यातील आश्रमशाळांना गेल्या तीन महिन्यांपासून तांदूळ पुरवठा नाही
घासलेट विक्रेते राजीनामा देण्याच्या तयारीत

वाशिम कडून आणखी

मांगूळझनक येथे एलसीबीची जुगारावर धाड; ११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल 
शिरपूर आरोग्य केंद्रात ‘रॅबीज लस’च नाही
कारंजात २७९ लाभार्थींना रेशनकार्डचे वितरण
वाशिममधील रस्ते नुतनीकरणात प्रचंड दिरंगाई!
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोमवारी हात धुवा मोहिम

आणखी वाचा