सुट्टीच्या दिवशीही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत माहितीचे संकलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 06:25 PM2019-02-10T18:25:00+5:302019-02-10T18:25:28+5:30

वाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम कृषी व महसूल विभागातर्फे सुट्टीच्या दिवशीही केले जात आहे.

Collection of information under Prime Minister Kisan Samman Yojna on the holiday day! | सुट्टीच्या दिवशीही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत माहितीचे संकलन !

सुट्टीच्या दिवशीही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत माहितीचे संकलन !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम कृषी व महसूल विभागातर्फे सुट्टीच्या दिवशीही केले जात आहे. 
अंतरिम अर्थसंकल्पाव्दारे केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकºयांना  खूश करण्याचा प्रयत्न केला असून, वर्षाला ६ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. या योजनेनुसार लोकसभा निवडणुकांआधिच अल्पभूधारक शेतकºयांच्या बँक खात्यावर पहिल्या दोन टप्प्यात ४ हजार रुपये जमा करण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे. दोन वर्षापूर्वी संकलित केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांची संख्या साधारणत: २ लाख ५ हजार ६९ अशी आहे. दोन वर्षात अल्पभूधारक शेतकºयांची संख्या वाढली का? या दृष्टिकोनातूनही माहितीची जुळवाजूळव केली जात आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंब निश्चित करणे आणि याकरिता राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कृषी गणना २०१५-१६ व नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाकरिता तयार करण्यात आलेली माहिती प्राप्त करून विहित नमुन्यात नोंद करणे. योजनेची गावात व्यापक प्रसिद्धी करून मोहीम स्वरुपात गावातील शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आली आहे. ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान गावनिहाय पात्र खातेधारक शेतकºयांची यादी तयार करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ९ व १० फेब्रुवारी अशा सुट्टीच्या दिवशीही कृषी व महसूल विभागाकडून माहिती संकलन केले जात आहे.

Web Title: Collection of information under Prime Minister Kisan Samman Yojna on the holiday day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.