भाजपच्यावतीने मालेगाव येथे स्वछता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:43 PM2018-06-27T18:43:23+5:302018-06-27T18:44:52+5:30

मालेगाव: भारतीय जनता पार्टीच्यावतीने  २७ जून रोजी मालेगाव शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

cleanliness campaign for BJP in Malegaon | भाजपच्यावतीने मालेगाव येथे स्वछता अभियान

भाजपच्यावतीने मालेगाव येथे स्वछता अभियान

Next
ठळक मुद्देपंचायत समितीच्या संपूर्ण परिसरातील घाणकचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.  या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

मालेगाव: भारतीय जनता पार्टीच्यावतीने  २७ जून रोजी मालेगाव शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत पंचायत समितीच्या संपूर्ण परिसरातील घाणकचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. 

मालेगाव येथे पंचायत समिती आवारात स्वच्छता स्वच्छता अभियान राबवण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत, जिल्हाप्रमुख स्वच्छता अभियान किसनराव माळेकर, करुणा कल्ले नगर परिषद सभापती, उषा वानखडे, तालुकाध्यक्ष वाशिम जगदीशराव देशमुख, पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, विठ्ठल धंदरे जिल्हा सरचिटणीस नितीन काळे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा रणजीत मेडशीकर, शहराध्यक्ष तेजस आरु, गोपीचंद गवळी, विशाल मानवतकर, सदाशिव देशमुख, दत्ता शिंदे, अमोल लहाने पंजाबराव घुगे राजू सांगळे गणेश कुठे सुरेश हगवणे अशा असंख्य भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माळेकर यांनी सांगितले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संकल्प घेतला असून, या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून गावागावांमध्ये स्वच्छता अभियान घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत सर्व गावांमध्ये स्वच्छता समित्या स्थापन करून त्यावर गाव स्वच्छता करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समिती आवाराची स्वच्छता करण्यात आली. प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत यांनी स्वच्छतेचे महत्त्व पदाधिकाºयांना समजावून सांगितले. आपला गाव आपला परिसर स्वच्छ ठेवून देशहिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: cleanliness campaign for BJP in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.