वाशिम, मालेगावात ‘गण, गण,गणात बोते’चा गजर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 03:17 PM2019-02-24T15:17:29+5:302019-02-24T15:17:56+5:30

मालेगाव (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम, मालेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरावर प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार २४ जानेवारी रोजी शहरात हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य पालखी काढण्यात आली.

The Chanting of 'Gan, Gan, Ganat Bote', in Washim, Malegaon | वाशिम, मालेगावात ‘गण, गण,गणात बोते’चा गजर  

वाशिम, मालेगावात ‘गण, गण,गणात बोते’चा गजर  

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम, मालेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरावर प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार २४ जानेवारी रोजी शहरात हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य पालखी काढण्यात आली. वाशिम येथे जागोजागी पालखीचे स्वागत करण्यात आले .
ढोल, ताशांच्या गजरात विविध ठिकाणी आतषबाजी करून या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी गण, गण, गणात बोतेच्या गजराने मालेगाव शहर दुमदुमले होते. 
 मालेगाव येथील वाशिम रोडवर असलेल्या संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २१ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. यात २४ फेब्रुवारीपर्यंत ७ अध्यायाचे सामुहिक वाचन करण्यात आले, तर सकाळी १० वाजत श्रींच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. ही पालखी दुर्गा चौकातून निघल्यानंतर गावातील मुख्य मागार्ने गांधी चौक, शिव चौक, मेडिकल चौक आणि जुन्या बस स्थानकामार्गे पुन्हा गजानन महाराज मंदिर येथे नेण्यात आली. पालखीत हजारावर महिला, पुरुष भाविकांचा सहभाग होता. ट्रॅक्टरवर थर्माकोलचे आकर्षक मंदीर तयार करण्यात आले होते. एका रथात गजानन महाराजांची सुशोभित प्रतिमा ठेवण्यात आली होती. या पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर विविध ठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळी काढली होती. सेवाभावी लोकांनी ठिकठिकाणी चहापान, फराळ आणि शीतपेयाची व्यवस्था करून पालखीतील भाविकांना वितरण केले. या सेवाभावी लोकांत आशिष बळी, मुन्ना शिर्के, किशोर महाकाळ, संजय रतनलाल लटुरिया यांचा समावेश होता. ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली.  ढोल, ताशा, टाळ, मृदंगाच्या गजरात गोभनी येथील वारकरी संप्रदायचे भाविक यात सहभागी झाले होेते. पालखीदरम्यान शांतरा राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: The Chanting of 'Gan, Gan, Ganat Bote', in Washim, Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.