मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 07:50 PM2017-10-05T19:50:16+5:302017-10-05T19:51:12+5:30

वाशिम: आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात असून अनेकठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर टाकण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा, असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या शिष्य वैभवीश्रीजी यांनी येथे केले.  श्री हनुमान रामकथेचे तृतीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. 

Celebrate the birth of girls! | मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा!

मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा!

Next
ठळक मुद्देवैभवीश्रीजी यांचे प्रतिपादनस्त्रीभू्रण हत्या देशाला लागलेला कलंक

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात असून अनेकठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर टाकण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा, असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या शिष्य वैभवीश्रीजी यांनी येथे केले.  श्री हनुमान रामकथेचे तृतीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. 
पुढे बोलताना आज अनेकजण कन्येची जन्मापुर्वीच गर्भात हत्या करतात. हा देशाला लागलेला मोठा कलंक आहे. मुलींना सुध्दा जन्माला येवू द्या, कारण भविष्यात ती लता मंगेशकर, सुनिता विल्यम, झाशीची राणी बनू शकते. मुलींनी सुध्दा श्रृंगार करताना संस्कृतीचे भान ठेवावे. ज्यामुळे वासना उत्पन्न होईल, असे वस्त्र परिधान करु नये. 
राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेला श्रृंगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणातून प्रकाशित झाला आहे. ज्यादिवशी या देशामध्ये खºयाअर्थाने मुलींना समान दर्जा देवून तीचा सन्मान केल्या जाईल त्यादिवशी निश्चितच दुष्काळ नष्ट होईल. प्रकृती आनंद व्यक्त करुन भरपूर पाण्याचा वर्षाव करील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
जेव्हा आपण कुणाला मदत करतो, तेव्हा तो प्रसाद बनतो. जिथे कथा होते, ते स्थळ तीर्थ बनते. चांगले कर्म आपल्याला आनंद मिळेल म्हणून करु नका, तर आनंदाने चांगले कर्म करा. कथेमुळे जीवनाची व्यथा नष्ट झाली पाहीजे. सद्गुरूची निवड करताना त्याची पुर्णपणे खात्री करुन घ्या, धर्मग्रंथात साधू व संतांचे लक्षण दिलेले आहे. भगवंताच्या कृपेने मिळालेले पद कुणीही घेवू शकत नाही. गुरुंच्या प्रती समर्पणाची श्रध्दा ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Celebrate the birth of girls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.