आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीस प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:10 PM2018-05-24T14:10:20+5:302018-05-24T14:10:20+5:30

वाशिम : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २४ मे ते ७ जून २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत जनजागृतीपर पंधरवडा राबविला जाणार आहे.

Awareness about modern agricultural technology! | आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीस प्रारंभ !

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीस प्रारंभ !

googlenewsNext
ठळक मुद्देशेती करण्याच्या पद्धतीतही शेतकऱ्यांनी बदल करून भरघोष उत्पादन घ्यावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसार करण्याच्या अनुषंगाने या पंधरवड्यात जनजागृती केली जाणार आहे.मार्गदर्शन व जनजागृती करण्यावर भर  आहे, असे वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी सांगितले.

वाशिम : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २४ मे ते ७ जून २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत जनजागृतीपर पंधरवडा राबविला जाणार आहे. २४ मे रोजी या पंधरवड्यास प्रारंभ झाला.

बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही शेतकऱ्यांनी बदल करून भरघोष उत्पादन घ्यावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे यासह विविध विषयांवर  ७ जून पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, अभियान, उपक्रम यांची माहिती तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धतीबाबत जनजागृती करणे, जमिनीची सुपीकता वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन, पिक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकºयांना सहभागी करून घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाºया नुकसानापासून पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे, प्रचलित योजनेचा लाभ न मिळणाºया तसेच कृषि तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसार करण्याच्या अनुषंगाने या पंधरवड्यात जनजागृती केली जाणार आहे.

पिक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रति थेंब अधिक पीक या संकल्पनांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करणे, कापसावरील शेंदरी बोंड अळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे, कापसावरील शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) आणि ट्रायकोकार्डसचे महत्व व वापराबाबत जनजागृती व मार्गदर्शन,  एकात्मिक शेती पद्धती, बहुवार पीक पध्दती, आंतरपीक पद्धतीविषयी जनजागृती, कृषि संलग्न व कृषि पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकºयांचे निव्वळ आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती, नैसर्गिक आपत्तीपासून बचावात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती, कीडनाशके हाताळणी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यावर भर  आहे, असे वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी सांगितले.

Web Title: Awareness about modern agricultural technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.